शेतकरी महिलांना गार्इंचे वाटप
By Admin | Updated: June 8, 2015 00:22 IST2015-06-08T00:22:44+5:302015-06-08T00:22:44+5:30
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत असल्या, तरी नापिकी, दुष्काळाचे ...

शेतकरी महिलांना गार्इंचे वाटप
पालकमंत्र्यांचे मिशन : १६ महिलांना दिल्या गीर जातीच्या गाई
अमरावती : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत असल्या, तरी नापिकी, दुष्काळाचे सावट कायम आहे. परिणामी शेतकरी विवंचनेतून बाहेर पडावा, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वखर्चातून रविवारी शेतकरी कुटुंबातील १६ महिलांना गीर जातीच्या गाई वाटप केल्यात.
येथील स्व. सूर्यकांताबाई पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कठोरा मार्गावरील पोटे फार्म येथे ना. प्रवीण पोटे यांच्या हस्ते सालोरा, पिंपरी, अमरावती, इंदला येथे महिलांना गीर जातींच्या दुधाळ गाईंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला आ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, रामदास आंबटकर, शिवराय कुळकर्णी, पत्रकार प्रदीप देशपांडे, दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहनकर, किरण पातुरकर यासह पशुसंवर्धन आदी उपस्थित होते.
यावेळी ना. पोटे यांनी महिलांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामीण भागात देशी गोवंश जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळावे व गरजू शेतकऱ्यांना जोडधंदा मिळावा, या हेतूने दुधाळ देशी गीर जातींच्या गार्इंचे वाटप करण्याचा संकल्प केला होता. त्या संकल्पाची पूर्ती रविवारी १६ महिला लाभार्थ्यांना गाई वाटपाने करण्यात झाली. दरवर्षी विभागात २०० गाईंचे वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाटण्यात आलेल्या गाईंचा विमादेखील त्यांनी काढलेला आहे. पशुसंवर्धन सहायक आयुक्त शैलेश पुरी व विभागाचे पालकमंत्र्यांनी कौतूक केले. यावेळी आ. अनिल बोंडे , विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ईश्वर चिठ्ठीने लाभाथ्यार्चे नाव काढण्यात आले.
या महिलांना मिळाल्यात गाई
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेल्या गार्इंमध्ये १६ महिलांना लाभ मिळाला. यात सालोरा येथील रिता यादव, अनुराधा देशमुख, सोनुबाई यादव, चंदन दिवाण, राजश्री दिवाण, गोपालपूरच्या माधुरी महल्ले, वंदना महल्ले, ज्योत्स्ना महल्ले, नीता वडे, पिंपरी येथील सविता महल्ले, संगीता महल्ले, पूनम खोडे, स्वाती महल्ले, संगीता यादव, इंदला येथील लक्ष्मीआप्पा, सुरेखाआप्पा यांचा समावेश आहे.
पालकमंत्री
भावूक झाले
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या मातोश्रीच्या नावे गरीब व गरजू शेतकरी कुटुंबातील महिलांना गाई वाटपाप्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना अचानक त्यांना लहानपण आठवले. घरी गाई होत्या, बाजारहाट व्हायचा, आर्इं काटकसर करुन घर चालवायची अशा आठवणी सांगताना पालकमंत्री भारावले. नकळत आईची आठवण आली, डोळे डबडबले. अन् ते क्षणभर थांबले. घरचा कारभार महिलांच्या हाती दिला तरच आर्थिक परिस्थिती सुधारेल, असे सांगत गाई वाटप मागील भूमिका पालकमंत्र्यांनी स्पष्ट केली.