महात्मा फुले महाविद्यालयात पदवी वितरण आणि १० गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:12 IST2021-07-26T04:12:31+5:302021-07-26T04:12:31+5:30
फोटो - वरूड २५ पी वरूड : स्थानिक महात्मा फुले कला वाणिज्य आणि सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण ...

महात्मा फुले महाविद्यालयात पदवी वितरण आणि १० गुणवंतांचा सत्कार
फोटो - वरूड २५ पी
वरूड : स्थानिक महात्मा फुले कला वाणिज्य आणि सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभात १० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, प्राचार्य जयवंत वडते, नॅक समन्वयक संजय सातपुते, विज्ञान विभागप्रमुख उमेश चौधरी, कला विभागप्रमुख सुनील काळमेघ, वाणिज्य विभागप्रमुख माधुरी उमेकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र संयोजक प्रभाकर डोळस, कार्यक्रम समन्वयक सुनील कोंडुलकर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठात मेरिट आलेल्या १० विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार आणि पदवी वितरित करण्यात आली. यात एमए अर्थशास्त्रमध्ये भाग्यश्री खेरडे हिने प्रथम येऊन सुवर्णपदक मिळविले. वाणिज्य शाखेतून प्रथम मेरिट आलेली कविता तळखंडकर, तृतीय मेरिट अंकिता मस्की, सातवी मेरिट गायत्री ठाकूर, आठवी मेरिट शुभांगी पाचपोहर, दहावी मेरिट प्रीती ठेंगेवार, एम ए मराठीमधून तिसरी मेरिट संघमित्रा गाडगे, एमएस्सी (संगणक विज्ञान) मध्ये चौथी मेरिट श्रद्धा अकर्ते तसेच विज्ञान शाखेतून सहावी मेरिट अश्विनी धांडे, आठवी मेरिट स्नेहा आंजीकर यांचा समावेश आहे. गुणवंतांचा पदवी, शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नरेशचंद्र ठाकरे व हर्षवर्धन देशमुख यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य वडते, संचालन पंजाब पुंडकर, चंदू पाखरे, अलका साबळे व आभार प्रदर्शन सुनील कोंडुलकर यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीव सभासद, गुणवंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते .