राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST2021-07-17T04:11:16+5:302021-07-17T04:11:16+5:30

फोटो - चांदूर रेल्वे : स्थानिक राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत चौथा पदवी वितरण समारंभ ...

Graduation Ceremony at Rajarshi Shahu Science College | राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ

राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ

फोटो -

चांदूर रेल्वे : स्थानिक राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामार्फत चौथा पदवी वितरण समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी अतुल विद्यामंदिर (वर्धा) च्या अध्यक्ष उत्तरा जगताप होत्या. उपाध्यक्ष वैष्णवी जगताप प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्राचार्य ठाकरे यांनी पदवीकांक्षींना उपदेश दिला. महाविद्यालयातर्फे गणित विषयातून एकूण ३०, जीवशास्त्र विषयातून एकूण ३८ आणि संगणकशास्त्र विषयातून एकूण २४ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातर्फे विज्ञान शाखेमधून विविध पारितोषिकेसुद्धा देण्यात आली. रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयामध्ये श्रुतिका वानखडे, भौतिकशास्त्र विषयामध्ये दिव्या जाधव आणि गणित विषयात चेतन राऊत हे विद्यार्थी हे पारितोषिकाचे मानकरी ठरले. विद्यार्थी ऑनलाईन हजर राहिले. संचालन संपदा पाथरकर यांनी केले.

160721\img-20210716-wa0004.jpg

photo

Web Title: Graduation Ceremony at Rajarshi Shahu Science College