ग्रामगीता जीवन विकास परीक्षा पदवीदान समारंभ
By Admin | Updated: October 24, 2016 00:13 IST2016-10-24T00:13:31+5:302016-10-24T00:13:31+5:30
आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण सुसंस्कार व आदर्श जीवनाचे शिक्षण मिळत नसल्यामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला नागरिक होईल.

ग्रामगीता जीवन विकास परीक्षा पदवीदान समारंभ
राष्ट्रसंत पुण्यतिथी उत्सव : समग्र वाङ्मयावर आधारित
गुरुकुंज मोझरी : आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण सुसंस्कार व आदर्श जीवनाचे शिक्षण मिळत नसल्यामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला नागरिक होईल. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र वाङ्मयावर आधारित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. शाळेत व शाळेच्याबाहेरसुद्धा या जीवन विकास परीक्षेचा उपक्रम राबविला पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात जीवन विकास परीक्षेच्या ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
उद्घाटन संचालक मंडळाच्या सदस्या पुष्पा बोंडे यांनी केले. यावेळी सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, वऱ्हाडी कवी जयंत चावरे, संस्कार भारतीचे विवेक कवटेकर, रामकृष्ण अत्रे, दिनकर येवलेकर, दीपक पुनसे, ममता इंगोले, ताराचंद कठाळे, अशोक कोठारी उपस्थित होते. यावेळी विजयालक्ष्मी थोटे, शीतल ठाकरे, वैशाली चौधरी, प्रणिती मिलके, शीतल कांडलकर, मंजूषा कविटकर, सरला येंडे, कल्पना जामगडे, जया सावरकर, लिला सावळीकर, करुणा हांडे, उज्ज्वला गमे, वसुधा उमरकर, योगेश गावंडे, विशाल बोरकर, देवीदास खडसे, रामकृष्ण गावंडे, रवींद्र काळबांडे, सुनील देशमुख, गजानन गाठेकर, नारायण कवटकर, मोरेश्वर माकडे यांना ग्रामगीताचार्य पदवी व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाचे सचिव गुलाब खवसे यांनी केले. अहवाल वाचन केशवदास रामटेके यांनी केले. गोपाल कडू यांनी आभार व्यक्त केले. (वार्ताहर)
कार्यकर्त्यांचा सत्कार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात श्रीगुरुदेव सेवामंडळाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक मंडळाचे उपाध्यक्ष एस. एन. सुब्बाराव होते. महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष व कल्याणचे आ.जगन्नाथ शिंदे, चंद्रपूरचे आ. नानाजी शामकुळे, उद्योजक एकनाथराव दुधे, सह्यांद्री दूरदर्शन केंद्राचे निर्देशक चंद्रमोहन नंदनपवार, नांदेड जिल्ह्यातील स्वच्छता दूत माधवराव झरीकर, निवृत्त अधीक्षक अभियंता प्रल्हाद भारती, केम प्रोजेक्टचे संचालक गणेश चौधरी, साहित्यिक भास्कर अरबट, वाशिमचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी ए. एम. यावलीकर, जगन्नाथ गावंडे, यादवराव मोहनकर, नानाजी नंदावरे, दीपक गोरे, ज्ञानेश्वर जवणे, श्याम कर्डीकर, केवलराम पंधरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रचार सेवाधिकारी बबनराव वानखेडे यांनी केले. संचालन रुपेश राऊत, आभार प्रदर्शन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.