पाणी पुरवठ्याच्या टँकर्सवर लागणार ‘जीपीएस’ सिस्टीम
By Admin | Updated: November 15, 2014 01:10 IST2014-11-15T01:10:46+5:302014-11-15T01:10:46+5:30
पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सद्वारा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही. टॅकर अनेकदा नियमित गावात पोहचतच नाही.

पाणी पुरवठ्याच्या टँकर्सवर लागणार ‘जीपीएस’ सिस्टीम
अमरावती : पाणी टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सद्वारा नियमित पाणी पुरवठा करण्यात येत नाही. टॅकर अनेकदा नियमित गावात पोहचतच नाही. मात्र पाणी पुरवठा केल्याचे कागदोपत्री दाखविल्या जाते. पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या मनमानी कारभाराला आता चाप बसनार आहे. संभाव्य पाणीपूरवठा कृती आराखड्यात या टॅँकर्सवर ‘जिपीएस’ सिस्टीम बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामूळे हे टँकर्स आता जिल्हा प्रशासनाच्या निगरानीत राहणार आहे.
ग्रामीण व शहरी भागात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. त्या अनूशंगाने संभाव्य पाणी टंचाई निवारनार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी ग्रामीण पाणीपूरवठा व स्वच्छता विभागाने आदेश पारीत केले. मागील पाच वर्षात टॅँकर्स द्वारा पाणी पूरवठा करण्यात आलेली गाव तालुके व वाड्यांची यादी तयार करण्यात आली. यामधून आलेली आकडेवारी भिन्न आहे.या प्रकारावर शासनाचे नियंत्रण रहावे यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात टँकर्सवर ‘जीपीएस’ (ग्लोबल पोझीशन सिस्टीम) यंत्रना बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामूळे पाणी टंचाई असनाऱ्या गावात टँकर पोहचलाच नाही याची माहिती जागेवरच मिळणार आहे. टँकर्स पाणी पुरवठा करण्यासाठी नविन निविदा स्विकारतानां व टँकर्सधारकासी करारनामा करतांना टँकर्सवर जिपीएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. ( प्रतिनिधी)