चार्ली कमांडोच्या दुचाकींवर लागणार जीपीएस सीस्टीम
By Admin | Updated: June 25, 2014 00:10 IST2014-06-25T00:10:11+5:302014-06-25T00:10:11+5:30
दिवसेंदिवस अमरावती पोलीस हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडुन विवीध उपाययोजना केल्या जात आहे.

चार्ली कमांडोच्या दुचाकींवर लागणार जीपीएस सीस्टीम
अमरावती : दिवसेंदिवस अमरावती पोलीस हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडुन विवीध उपाययोजना केल्या जात आहे.
शहरात फीरणारे चार्ली कमांडो व पेट्रोलींग मोबाईलमध्ये फीरणाऱ्या अधिकाऱ्यांची परीपुर्ण माहीती वरीष्ठ अधिकाऱ्यांना मीळण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात ग्लोबल पोजीशनिंग सीस्टीम (जीपीएस सिस्टीम ) प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे. ही सीस्टीम चार्ली कमांडोंच्या दुचाकींसह पेट्रोलींग मोबाईलमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरात घरफोडी, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांवर आळा बसवीण्यासाठी पोलीस प्रशासनाकडुन विवीध उपाययोजना केल्या जात आहे. एखाद्या ठीकाणी घडलेल्या घटनेची माहीती नियंत्रण कक्षाला मीळताच त्या ठीकाणी तत्काळ चार्ली कमांडो कींवा पेट्रोलींग मोबाईलमध्ये गस्तीवर असणारे अधिकारी पोहचुन नागरीकांना मदत मीळण्यासाठी शहरात जी.पी.एस.सीस्टीम कार्यप्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सीस्टीम शहरात गस्त घालणाऱ्या चार्ली कमांडोंच्या दुचाकी व पेट्रोलींग मोबाईलमध्ये लावण्यात येणार आहे. याचे मॉनिटर नियंत्रण कक्षात बसविण्यात येणार आहे. या मॉनिटरवर अधिकारी व कर्मचारी कोणत्या परिसरात गस्त करीत आहेत याची थेट माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. यामध्ये कुणी चुकीची माहिती दिल्यास त्यांच्यावर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे ही सिस्टम लागू होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक शहरात गस्त घालण्याचे संकेत देण्यात आले आहे. लवकरच ही सिस्टम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली. (प्रतिनिधी)