गो. सी. टोम्पे महाविद्यालयात वीरमातेची रक्ततुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:13+5:302021-01-14T04:11:13+5:30

सलग १५ वर्षे उपक्रम, १६४ रक्तदात्यांतर्फे रक्तदान चांदूर बाजार - स्थानिक गो.सी. टोम्पे महाविद्यालयात स्व. संजय टोम्पे व समीर ...

Govt. C. Virgo's bloodstream at Tompe College | गो. सी. टोम्पे महाविद्यालयात वीरमातेची रक्ततुला

गो. सी. टोम्पे महाविद्यालयात वीरमातेची रक्ततुला

Next

सलग १५ वर्षे उपक्रम, १६४ रक्तदात्यांतर्फे रक्तदान

चांदूर बाजार - स्थानिक गो.सी. टोम्पे महाविद्यालयात स्व. संजय टोम्पे व समीर देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त फुबगाव येथील शहीद विजय पळसपगार यांच्या मातोश्री शोभा वासुदेवराव पळसपगार यांची रक्ततुला करण्यात आली. यावेळी १६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भास्कर टोम्पे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कोविड रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवि भूषण, अंबादेवी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे, नगराध्यक्ष नितीन कोरडे, किशोर बेंद्रे, ठाणेदार सुनील किनगे, विद्यापीठाचे रासेयो संचालक राजेश बुरंगे, रक्तदान समिती अध्यक्ष महेंद्र भुतडा, अजय दातेराव, संजय तीरथकर, प्रवीण बुंदिले, परवेज शेख, प्राचार्य संजय शिरभाते, गोविंद कासट, सुनील खराटे, संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर नानोटे, डॉ. विजय टोम्पे, मनोज कटारिया, नगरसेवक टिकू अहिर, प्राचार्य राजेंद्र रामटेके, शोभा पळसपगार प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोरोनाकाळात केलेल्या कार्याची दखल घेऊन डॉ. रवि भूषण व राजेश बुरंगे यांचा कोविडयोद्धा म्हणून गौरव सन्मानपत्र व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. शोभा पळसपगार यांचा साडी-चोळी व पुस्तक देऊन सत्काराबरोबरच रक्ततुलाही करण्यात आली. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक, परिसरातील नागरिक, विविध सामाजिक संघटना सहभागी होऊन एकूण १६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली.

रक्तसंकलनासाठी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची रक्तपेढी चमू डॉ. ऋचा सारडा, डॉ. समीर कडू, दिनेश चरपे, हरीश खार, कुणाल वरघट, अमोल टेटू, अमित धरणे यांचे सहकार्य लाभले. संचालन संजय शेजव यांनी केले. आभार प्रशांत देवतळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Govt. C. Virgo's bloodstream at Tompe College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.