गो. सी. टोम्पे महाविद्यालयात रोगनिदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:12 IST2021-02-12T04:12:44+5:302021-02-12T04:12:44+5:30
चांदूर बाजार : स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरिता रोगनिदान शिबिर घेण्यात आले. ...

गो. सी. टोम्पे महाविद्यालयात रोगनिदान शिबिर
चांदूर बाजार : स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरिता रोगनिदान शिबिर घेण्यात आले. संजय टोम्पे व समीर देशमुख यांच्या १७ व्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ राष्ट्रीय सेवा योजना, महिला तक्रार निवारण समिती, स्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख शिक्षण महाविद्यालय, अध्यापक विद्यालय आणि जेसीआय अमरावती गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव भास्कर टोम्पे, प्रमुख मार्गदर्शक चंद्रकांत ताठे, बाल रोगतज्ज्ञ ऋषिकेश नागलकर, रश्मी नागलकर, प्राचार्य राजेंद्र रामटेके, राजेश बुरंगे, नीलेश कडू, प्राचार्य संजय शेजव, प्र-प्राचार्य प्रशांत देवतळे उपस्थित होते. याप्रसंगी ऋषिकेश नागलकर व रश्मी नागलकर यांनी किशोरावस्थेतील मुला-मुलींकरिता आरोग्यविषयक समस्या निवारणावर मार्गदर्शन केले. गरजू रुग्ण विदयार्थांना व विद्यार्थिनींना तपासणीअंती औषधोपचार केले.