शासनातर्फे विभागीय आयुक्तांनी केले गांधारीचे कौतुक
By Admin | Updated: May 30, 2016 00:37 IST2016-05-30T00:37:52+5:302016-05-30T00:37:52+5:30
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत अंध, अपंंग व बालसुधारगृहातील ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या मानसकन्या...

शासनातर्फे विभागीय आयुक्तांनी केले गांधारीचे कौतुक
शाबासकीची थाप : बालगृहात आनंद
परतवाडा : वझ्झर येथील स्व. अंबादासपंत अंध, अपंंग व बालसुधारगृहातील ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या मानसकन्या माला व गांधारी बारावीच्या शालांत परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी शासनातर्फे त्यांचे कौतुक केले. दोन्ही अंध असताना त्यांनी डोेळस विद्यार्थ्यां सारखी परीक्षा देत हे यश संपादन केले आहे. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता वझ्झर येथे त्यांचा गौरव केला. यावेळी तहसीलदार मनोज लोणारकर, शंकरबाबा पापळकर यांची उपस्थिती होती. यावेळी वझ्झर येथील बालसुधारगृह आनंदून गेले होते.