शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

शासनाने विदर्भाच्या सिंचनाची श्वेतपत्रिका काढावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:19 PM

मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी.

ठळक मुद्देसुनील तटकरे : हल्लाबोल आंदोलनातून फसवे सरकार खाली खेचू

आॅनलाईन लोकमतअमरावती : मुख्यमंत्री, अर्थमंत्री हे विदर्भातील असताना त्यांनी गत तीन वर्षांत सिंचनवाढीसाठी काय प्रयत्न केले, याची श्वेतपत्रिका काढावी. विदर्भात जी काही सिंचन क्षमता वाढले, ती आघाडी शासनाच्या काळातील असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी येथे केला.सुनील तटकरे हे अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित विभागीय पदाधिकारी मेळाव्यात आले होते. त्यांनी पत्रपरिषदेतून भाजप सरकारवर हल्ला चढविला. राज्यातील सर्व शेतकºयांना २५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफी मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्याकरिता ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला, तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आॅनलाइन प्रक्रि येत घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले. प्रधान सचिव गौतम प्रधान यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र, एवढ्यावर हा प्रश्न सुटणार नाही. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यापारी, गृहिणी या सर्वांना हे अपयशी सरकार नकोच आहे, असे तटकरे म्हणाले. विधान परिषदेत भाजपसोबत हातमिळवणी करणार काय, या प्रश्नावर तटकरे म्हणाले, सत्तेसाठी तडजोड करणार नाही. समविचारी पक्षांसोबत मैत्री करू.विदर्भात सिंचन अनुशेषवाढीला पश्चिम महाराष्ट्रातील नेते जबाबदार असल्याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, विदर्भात सिंचन वाढले ते केवळ आघाडी सरकारच्या कार्यकाळात. खुद्द नितीन गडकरींनी २३.५ टक्के सिंचन असल्याचे एका कार्यक्रमात जाहीर केल्याचा मुद्दा तटकरेंनी यावेळी नमूद केला. सिंचन घोटाळा आरोपाच्या पार्श्वभूमीवर तटकरेंने छेडले असता, ते म्हणाले, मी चौकशीला घाबरत नाही. १२ डिसेंबर २०१४ पासून चौकशी सुरू असून, पूर्णत: सहकार्य करीत आहे. खरेच घोटाळा झाला काय, हे राज्यातील १२ कोटी जनतेसमोर एकदाचे यावे, ही माझीसुद्धा मागणी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत जास्त बोलता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.माजी मंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, रमेश बंग, सुभाष ठाकरे, वसुधा देशमुख, संदीप बाजोरिया, आ. प्रकाश गजभिये, आ. ख्वाजा बेग, वसंत घुईखेडकर, सुरेखा ठाकरे, सुनील वºहाडे, बाबा राठोड आदी यावेळी उपस्थित होते.नागपुरात १२ डिसेंबर रोजी सरकारविरोधी हल्लाबोलशेतकºयांना आरोपींच्या पिंजºयात उभे करणाऱ्या राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राष्ट्रवादीने यवतमाळातून १ नोव्हेंबरपासून दिंडी यात्रेचे आयोजन केले आहे. नागपुरात १२ डिसेंबरला पुरोगामी विचारसरणीचे पक्ष एकत्र येणार असून, सरकारविरोधी हल्लाबोल सभेला खा. शरद पवार हे संबोधित करतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.