लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मॅकेनिक्स इंजिनिअरिंग पेपरफूटप्रकरणी राज्य शासनाने विद्यापीठाला जाब विचारला आहे. याप्रकरणी विद्यापीठाने कोणत्या स्वरूपाची कारवाई केली, याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे. विधिमंडळ सचिवांचे पत्र विद्यापीठात धडकले आहे.अमरावती विद्यापीठाचे पेपरफूट प्रकरण उन्हाळी अधिवेशनात चांगलेच गाजले होते. आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी याविषयी सभागृहात शिक्षण विभागाच्या कारभारावर बोट ठेवले होते. दरम्यान उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अमरावती विद्यापीठाच्या पेपरफूट प्रकरणी झालेल्या कारवाईचा वृत्तांत सभागृहात मांडला. मात्र, विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी याप्रकरणाची पायेमुळे निखंदून काढण्यासाठी सीआयीडी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सभागृहाने याप्रकरणी सीआयडी चौकशीची घोषणा केली आहे. मात्र, पेपरफूटप्रकरणी अद्यापपर्यंत सीआयडी चौकशी सुरू व्हायची असून, तत्पूर्वी विधिमंडळ सचिवांनी कारवाईबाबत थेट विद्यापीठाला विचारणा केली आहे. सिनेट सभागृहात झालेल्या निर्णयानुसार विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळ संचालक हेमंत देशमुख यांनी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार नोंदविली होती. याआधारे पोलिसांनी यातील मुख्य आरोपी आशिष राऊत, ज्ञानेश्वर बोरे आणि निखिल फाटे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले होते. माइंड लॉजिक एजन्सीचे प्रबंधक शैलेंद्र टंडन यांचेही पोलिसांनी बयाण नोंदविले आहे. याप्रकरणी विद्यापीठ व पोलिसांनी त्यांच्यास्तरावर योग्य कार्यवाही केली आहे. परंतु, आतापर्यतचे ‘अॅक्शन टेकन’ विधिमंडळाला अहवाल स्वरुपात पाठवावे लागणार आहे. परीक्षा व मूल्यांकन विभागात त्याअनुषंगाने वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्दमॅकेनिक्स इंजिनिअरींग पेपरफूट प्रकरणी वाशीम येथील सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयातून धागेदोरे असल्याची बाब विद्यापीठाच्या प्राथमिक चौकशीअंती पुढे आली. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशान्वये सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठाने पेपरफूट प्रकरणी त्वरेने कारवाईची पावले उचलल्याचे दिसून येते.
पेपरफूटप्रकरणी शासनाने विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:05 IST
अमरावती विद्यापीठाचे पेपरफूट प्रकरण उन्हाळी अधिवेशनात चांगलेच गाजले होते. आमदार यशोमती ठाकूर, आमदार वीरेंद्र जगताप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी याविषयी सभागृहात शिक्षण विभागाच्या कारभारावर बोट ठेवले होते. दरम्यान उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अमरावती विद्यापीठाच्या पेपरफूट प्रकरणी झालेल्या कारवाईचा वृत्तांत सभागृहात मांडला.
पेपरफूटप्रकरणी शासनाने विचारला जाब
ठळक मुद्देविधिमंडळ सचिवांचे पत्र : कार्यवाहीबाबत पाठविणार वस्तुनिष्ठ अहवाल