शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

ज्वारीची शासन खरेदी; १० कोटींचे पेमेंट केव्हा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 11:27 IST

आतापर्यंत ८३,५५१ क्विंटल खरेदी : मुदतवाढीनंतर ३१ ऑगस्ट डेडलाइन

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासन आधारभूत किमतीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ८३,५५१ क्विंटल उन्हाळी ज्वारीची खरेदी करण्यात आली. यामध्ये खरेदी केलेल्या ज्वारीचे ९.८० कोटींचे चुकारे अद्याप शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीतील प्रतीक्षेत आहेत.

किमान आधारभूत खरेदी योजनेत जिल्ह्यात उन्हाळी ज्वारीची खरेदी नऊ तालुक्यातील खरेदी-विक्री संघामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला. शासनानेही ३,१८० रुपये क्विंटल असा हमीभाव दिलेला आहे. त्यातुलनेत खासगीमध्ये २००० ते २२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची धाव शासन खरेदी केंद्रांकडे आहे. विशेष म्हणजे, शासनानेही जिल्ह्याचे लक्ष्यांक दोन वेळा वाढवून दिले व खरेदीसाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत दिली आहे. 

जिल्ह्यात २७ जूनपर्यंत ३,६९२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यातुलनेत २६ ऑगस्टपर्यंत २,४४७ शेतकऱ्यांची ८३,५५१ क्विंटल ज्वारी खरेदी केली गेली. शासनाने वाढीव ६१ हजार क्विंटलचे टार्गेट दिल्याने जिल्ह्यात १.६१ लाख क्विंटल ज्वारीची खरेदी शासनमान्य दराने होणार आहे 

ज्वारी खरेदीची जिल्हास्थिती आतापर्यंत झालेली खरेदी: ८३,५५१ क्विंटल हमीभावाने होणारी रक्कम २६,५६,९५१०५ रु. शासनाकडून प्राप्त रक्कम : १६,७६,३३,२२३ रु. वाटप केलेली रक्कम : १६,६२,७३,५८३ रु. शासनाकडून अप्राप्त रक्कम: ९,८०,६१,८८२ रु.

ज्वारीची तालुकानिहाय खरेदी जिल्हा विपणन अधिकारी यांच्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात २,१६१ क्विंटल, अचलपूर २७,१८२ क्विंटल, दर्यापूर ७,७६८ क्विंटल, नांदगाव २,४०६ क्विंटल, मोर्शी १०,२९५ क्विंटल, अंजनगाव सुर्जी १४,९१५ क्विंटल, चांदूरबाजार ११,८७६ क्विंटल, तिवसा ४,०३१ क्विंटल व चांदूर रेल्वे तालुक्यात २,९१४ क्विंटल ज्वारीची खरेदी केली गेली.

"मुदतवाढीनंतर ३१ ऑगस्टपर्यंत ज्वारीची खरेदी होणार आहे. बारदानाही उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारे शासनाकडून लवकरच प्राप्त होणार आहेत."- अजय बिसने, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती