ंभाजप शासनाचे धोरण जनहितविरोधी
By Admin | Updated: October 7, 2015 01:19 IST2015-10-07T01:19:25+5:302015-10-07T01:19:25+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असताना भाजप शासनाने देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढविल्या आहेत.

ंभाजप शासनाचे धोरण जनहितविरोधी
महागाईला विरोध : जिल्हा ग्रामीण काँग्रेसची निदर्शने
अमरावती : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असताना भाजप शासनाने देशभरात पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढविल्या आहेत. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. भाजपच्या या जनहितविरोधी धोरणाचा जिल्हा ग्रामण्ीा काँग्रेसने तीव्र निषेध केला. तालुका व जिल्हास्तरावर काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख यांनी ही माहिती पत्रपरिषदेत मंगळवारी दिली.
या करवाढीमुळे तसाच ग्राहकांवर लिटरमागे ७.५० रूपयांचा अतिरिक्त भार पडतो आहे. अशातच राज्य शासनाने आणखी २ रूपयांची प्रती लिटरमागे वाढ करून ग्राहकांवरील बोझा वाढविला आहे.
राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. अशा स्थितीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व मदतीची गरज आहे. मात्र ही मागणी शासनाने फेटाळून लावल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी पत्रपरिषदेतून केला. शासनाने शेतकरी, शेतमजूर व जनहिताच्या प्रश्नांवर न्याय द्यावा अन्यथा काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला प्रकाश काळबांडे, संजय मार्डीकर, श्रीराम नेहर, छाया दंडाळे, उषा उताणे, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, संजय मापले, भागवत खांडे, बिट्ू मंगरोळे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.