शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

शासनादेश पायदळी, मास्कची दामदुप्पट दराने विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 21:48 IST

Corona Mask: कारवाई केव्हा ? : एन-९५ मास्क १०० ते १२५ रुपयांत

संदीप मानकर

अमरावती : शासननिर्णयानुसार एन-९५ मास्कची किंमत १९ ते ४९ रुपये, तीन पदरी मास्क चार रुपये, तर दोन पदरी मास्क तीन रुपये असे दर जाहीर झाले. मात्र, यासंदर्भात शहरातील तीन मेडिकलमध्ये ते एन-९५ मास्क चक्क १०० ते १२५ रुपयांना विक्री होत असल्याचे ह्यरिॲलिटी चेकह्ण दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रतिष्ठानांविरुद्ध कारवाई केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेषता! कुठल्याही केमिस्ट व ड्रगिस्टकडे नागरिकांना दिसेल अशा दर्शनी भागात मास्कच्या किमतीचे फलक लागलेले नव्हते. ह्यहम बोले सो कायदाह्ण अशी भूमिका मेडिकल स्टोअरच्या संचालकांची दिसून आली. १९ ते ४९ रुपयांना मिळणारे वेगवेगळ्या कंपनीचे मास्क १०० ते १२५ रुपयांना विक्री करीत असल्याचे त्यांनीच सांगितले. तीन पदरी मास्कचे दर चार रुपये शासनाने निश्चित केले असले तरी मेडिकल स्टोअरमध्ये ते ३० ते ३५ रुपयांना विकले जाते. दोन पदरी मास्क शासनिर्धारित तीन रुपयांऐवजी १० ते १५ रुपयाला विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. अशा ड्रगिस्ट व केमिस्टवर एफडीएचे अधिकारी कारवाई करतील का, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

या ठिकाणी रिॲलिटी चेक

ह्यलोकमतह्ण प्रतिनिधीने शहरातील दोन चौकातील तीन मेडिकल स्टोअरमध्ये मास्कची किंमत विचारली. राजकमल चौकातील एका मेडिकलमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एन-९५ मास्क हे १०० ते १२५ रुपयांना असल्याचे सांगण्यात आले. अन्य एका मेडिकलमध्ये एन ९५ मास्क १०० रुपयांना असल्याचे सांगण्यात आले.नवीन आदेशाची माहिती आहे, मात्र, जुनाच स्टॉक शिल्लक असल्याने विक्री सुरू असल्याचे एका मेडिकल स्टोअरकडून सांगण्यात आले. कुठल्याही दर्शनी भागात किमतीचे फलक लावण्यात आले नव्हते. पंचवटी चौकातील एका मेडिकलमध्ये तीन पदरी मास्क ३५ रुपयांना, तर दोन पदरी मास्क १० ते १५ रूपयाला विक्री करण्यात येत होती.

मास्कचा प्रकार शासनाचे दर मेडिकलमध्ये विक्रीएन-९५ १९ ते ४९ रुपये             विक्री १०० ते १२५ रुपये

तीन पदरी ४ रुपये             विक्री ३० ते ३५ रुपयेदोन पदरी ३ रुपये             विक्री १० ते १५ रुपये

जुन्याच्या मालाची विक्री

शासनाने मास्क विक्रीसंदर्भात नवीन दर ठरविले. मात्र, आमच्याकडे जुन्या दरात खरेदी केलेले मास्क शिल्लक असल्याने एन -९५ मास्क १०० रुपयांना विकावे लागत आहे. अद्याप नवीन मास्क खरेदी केले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मास्कची मागणी घटली. यानंतर शासन नियमांचे पालन करू, असे एका मेडिकल संचालकाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस