जिल्ह्यात सुरू होणार शासकीय मूग खरेदी केंद्र
By Admin | Updated: September 2, 2016 00:17 IST2016-09-02T00:17:11+5:302016-09-02T00:17:11+5:30
नव्या मुगाची बाजारात आवक होताच दरात मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने मुगाची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यात सुरू होणार शासकीय मूग खरेदी केंद्र
पणन मंत्र्यांच्या सूचना : हमीभावाने होणार खरेदी
अमरावती : नव्या मुगाची बाजारात आवक होताच दरात मोठी घसरण झाली आहे. या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने मुगाची हमीभावाने खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. १ सप्टेंबरपासून खरेदीस प्रारंभ करण्याच्या सूचना राज्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार लवकरच जिल्ह्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहेत. दरम्यान केंद्र शासनाने मूग उत्पादक राज्यांना शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्याचेही निर्देश दिले आहेत.
सद्या बाजारात मुगाची आवक सुरू झालेली असून शेतकऱ्यांना आधारभूत दरापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने प्रचलित पद्धतीनुसार खरेदी सुरू करण्यासाठी नाफेडला पणन महासंघाकडून विनंती करण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरात मूग विकू नये असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. मागील दोन वर्षांपासून कडधान्य आणि डाळींच्या दरात वाढ झाल्याने शासनाने शेतकऱ्यांनी कडधान्याचा पेरा वाढविण्याचे आवाहन केले होते. याकरिता हमी भावातही वाढ करण्यात आली परिणामी जिल्ह्यात कडधान्याचा पेरा बऱ्यापैकी वाढला आहे. अशातच नव्या मुगाची आवक बाजारपेठेत सुरू होताच भावात ३५०० रुपयांपर्यंत घसरण झाली. मुगाचा हमीभाव ५२२५ रुपये प्रति क्विंटल आहे. बाजारात मात्र या हमी भावापेक्षाही कमी भावाने शेतकऱ्यांन मिळत असल्याने हा प्रश्न धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांची २९ आॅगस्ट रोजी मुंबईत भेट घेवून निदर्शनास आणून दिली होती. पोळा सण तोांवर आल्यानंतरही शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने व्यापाऱ्यांकडून मूग खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र हमीभावाने मूग खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासोबतच जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनाही याबाबत निवेदन दिले होते. ही बाब लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे.याबाबत संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)