सहसचिवांच्या आगमनामुळे शासकीय रुग्णालय प्रशासनाची उडाली तारांबळ
By Admin | Updated: December 21, 2015 00:06 IST2015-12-21T00:06:37+5:302015-12-21T00:06:37+5:30
आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांनी रविवारी आकस्मिक भेटी दिल्यामुळे सुपर स्पेशालिटी, डफरीन व इर्विन रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

सहसचिवांच्या आगमनामुळे शासकीय रुग्णालय प्रशासनाची उडाली तारांबळ
आकस्मिक भेट : सुपर, डफरीनची केली पाहणी
अमरावती : आरोग्य मंत्रालयाच्या सहसचिवांनी रविवारी आकस्मिक भेटी दिल्यामुळे सुपर स्पेशालिटी, डफरीन व इर्विन रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
आरोग्य सहसचिव टी.एम. कोळेकर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटीत भेट दिली. कोळेकर यांच्या दौऱ्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला होती. त्यामुळे सहसचिव येण्यापूर्वी यंत्रणा व्यवस्थीत करण्याची तयारी सुरू झाली होती. इर्विन रुग्णालयात सर्व कर्मचारी ड्रेस व ओळखपत्र घालून उपस्थित होते. त्याचप्रमाणे डफरीन रुग्णालयातही सहसचिवांची प्रतीक्षा सुरु होती. कोळेकर यांनी प्रथम जिल्हा स्त्री रुग्णालयात जावून तेथील स्किल लॅब, प्रशिक्षण केंद्र, एनआयसीयू, लेबर रुम व लेबर वार्डची पाहणी केली. त्यानंतर सुपर स्पेशालिटीतील सर्व विभागाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असता नियमीत भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्रालयातील सहसचिव टी.एम.कोळेकर यांनी रुग्णालयाला आकस्मिक भेट दिली. त्यांनी विविध विभागांची पाहणी केली.
-अरुण यादव, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय.