शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या मदतीसाठी शासनाचे घूमजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:08 IST

खरिपाच्या दोन लाख हेक्टरवरील कपाशीचे गुलाबी बोंडअळीने नुकसान झाले. यासाठी शासनाने हेक्टरी ३०,८०० रूपयांची मदत जाहीर केली. प्रत्यक्षात ‘एनडीआरएफ’च्या मदतीसाठी शासनाची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देबोंडअळीमुळे नुकसानकृषी विभाग करणार स्वतंत्र कारवाईशुक्रवारच्या शासनादेशात स्पष्ट

रोशन कडू ।आॅनलाईन लोकमततिवसा : खरिपाच्या दोन लाख हेक्टरवरील कपाशीचे गुलाबी बोंडअळीने नुकसान झाले. यासाठी शासनाने हेक्टरी ३०,८०० रूपयांची मदत जाहीर केली. प्रत्यक्षात ‘एनडीआरएफ’च्या मदतीसाठी शासनाची धावपळ सुरू आहे. उर्वरित विमा व बियाणे कंपनीचे कृषी विभाग कार्यवाही करेल, असे शुक्रवारी निर्णयाद्वारे स्पष्ट करत शासनाने घुमजाव केले.बीटी तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच शेतकऱ्यांवर आरिष्ट्य ओढावल. जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरमधील कपाशी पीक उद्वस्त झाले. हजारो हेक्टरमधील कपाशीच्या उभ्या पिकात शेतकऱ्यांनी नांगर फिरिवला. शेतकरी आक्रमक झाल्यानेच शासनाने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश ७ डिसेंबरला देऊन अहवाल मागितला. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बोंड अळीने बाधित क्षेत्राला दोन हेक्टर मर्यादेत जिरायती कपाशीला हेक्टरी ३० हजार ८०० रुपये, तर बागायती कपाशीला ३७ हजार ५०० रूपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आता मात्र ‘एनडीआरएफ’च्या मदतीसाठी शासनस्तरावर हालचाली होत असल्याने विमा व बियाणे कंपनीकडून मिळणाºया मदतीचे काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.पीक विम्याच्या भरपाईबाबत संभ्रमबोंडअळीच्या बाधित क्षेत्राला पीक विम्याची हेक्टरी ८ हजारांची नुकसान भरपाई देण्यात येईल, असे कृषी मंत्र्यांनी जाहीर केले असले तरी पीक विमा उंबरठा उत्पन्नावर जाहीर होतो. त्यासाठी आता तालुका हा घटक गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकच ठिकाणी मिळणारी भरपाई सारखी कसी राहील, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.बियाणे कंपन्यांचे भरपाईचे काय?बीटी बियाणे तंत्रज्ञान अपयशी ठरल्यानेच यंदा बोंड अळीचे संकट ओढावले, याविषयी हजारो तक्रारी झाल्यात काही तक्रारी पोलीस ठाण्यातही झाल्यात. पाच कंपणीचे बियाणे सदोष असल्याने शासनाने ‘एसआयटी’ गठित केली. या बियाणे कंपन्या कापूस नियंत्रण कायद्यांतर्गत हेक्टरी १६ हजारांची भरपाई देणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.बीटी कंपन्यांनी आधी शेतीपिकांचा विमा काढावा व नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असे स्वामीनाथन आयोगात नमूद आहे. याविषयी केंद्र व राज्य सरकार का आग्रही नाही. बियाणे नियंत्रण कायदा कंपन्या कितपत मानतील, याविषयी शंकाच आाहे- विजय जावंधिया, शेतकरी नेते