शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाचा शासनाला विसर, २० वर्षापासून काम रखडलेले

By गणेश वासनिक | Updated: December 29, 2022 14:23 IST

गोंडी संस्कृतीचा प्रचार-प्रसार कसा होणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आदिवासींचे साकडे

अमरावती : गोंडी संस्कृतीचा प्रचार-प्रसार व संवर्धन झाले पाहिजे म्हणून गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय २००२ मध्ये नागपूर येथे मंजूर झाले. परंतु २० वर्षे होऊनही काम रखडलेले आहे. मात्र आता गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ट्रायबल फोरमने केली आहे.  

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपतींनी या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देत एक उपकेंद्र नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या उपकेंद्राला गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय असे नाव देण्यात आले आहे. विदर्भात गोंडीयन समाज मोठ्या प्रमाणात आहे. इतिहासामध्ये गोंडीयन संस्कृती व गोंड राजांना अनन्यसाधारण महत्व आहे. विशेष म्हणजे नागपूर नगरी गोंडराजे बख्तबुलंदशहा यांनी बसवली आहे. आदिवासी समाजाचे जीवन, कला, भाषा, संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत दोन टप्प्यात २१ कोटी रुपये मंजूर केले आहे. पैसा येऊन एक दशक उलटून गेले तरी गोंडवाना संग्रहालयाच्या कामाला गती मिळाली नाही.जागा आणि निधी उपलब्ध

गोंडवाना संग्रहालयासाठी केंद्र सरकारने सन २०१४ मध्ये १० कोटी व २०१५ मध्ये ११ कोटी असे एकूण २१ कोटी रुपये मंजूर केले आहे. त्यातून बांधकामाचा खर्च करण्यात येणार होता. जागेअभावी संग्रहालयाचे काम रखडलेले होते. मात्र २०१९ मध्ये सुराबर्डी येथील १२ एकर जागा संग्रहालयाला हस्तांतरीत करण्यात आली आहे. जागा व पैसा उपलब्ध असूनही संग्रहालयाचे घोंगडे भिजतच आहे.गोंडी संस्कृतीचे संवर्धन व्हावे

बोलीभाषा, पारंपारिक पोशाख, दागदागिने, देवदेवता,साहित्य, जीवनकला, संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे. लवकरात लवकर गोंडवाना संग्रहालयाचे काम व्हावे. याकरिता राज्य सरकारला शिष्टमंडळाने भेट देवून निवेदन दिले आहे.

- अँड. प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाAmravatiअमरावतीGovernmentसरकार