सरकारला भयअन्नदात्याचे
By Admin | Updated: June 8, 2017 00:01 IST2017-06-08T00:01:33+5:302017-06-08T00:01:33+5:30
महाराष्ट्रात ‘न भूतो न भविष्यती’ असे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आठवडा उलटला असला तरी आंदोलनाची धार बोथट झालेली नाही.

सरकारला भयअन्नदात्याचे
गनिमीकाव्याचा धसका : लोकप्रतिनिधींना सुरक्षा
अमरावती : महाराष्ट्रात ‘न भूतो न भविष्यती’ असे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आठवडा उलटला असला तरी आंदोलनाची धार बोथट झालेली नाही. उलट ती अधिकाधिक तीव्र होतेय. पोशिंद्याची एकजूट अन् उग्र भावनांचा धसका आता शासनाने घेतला असून लोकप्रतिनिधींनाच संरक्षणाची गरज भासते आहे. वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनांची श्रुंखला पोलिसांसाठी देखील डोकेदुखी ठरली आहे. ग्रामीण भागातील हे लोण शहरी भागापर्यंत पोहोचले असून पालकमंत्र्यांसह आमदार, खासदारांच्या निवास्थानांभोवती पडलेल्या पोलिसांच्या गराड्यावरून आंदोलनाची तीव्रता लक्षात येते.
नामदार, खासदार, आमदारांच्या निवासस्थानी खडा पहारा
शेतकरी बदलणार रणनिती
आज मोबाईल टॉवर ‘टार्गेट’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका घेत बुधवारी पालकमंत्र्यांसह आमदार व खासदारांच्या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये आठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या धसक्यामुळे पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली असून आंदोलनकर्ते दररोज अधिकाधिक आक्रमक होत असल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे. बुधवारी आमदार व खासदारांच्या निवासस्थांसमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर तैनात करण्यात आला होता. गुरूवारी आंदोलक शेतकरी शेतांमधील ‘मोबाईल टॉवर्स’ लक्ष्य करणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी टॉवर्सबद्दलची माहिती महापालिकेकडून मागविण्याचे काम सुरू केले आहे. बुधवारपासून शहरात पोलीस अलर्ट झाले आहेत. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आमदार व खासदारांची निवासस्थाने आहेत. तेथे त्या-त्या ठाण्यातील पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगरातील निवासस्थानी तसेच त्यांच्या कॅम्प मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात गाडगेनगर ठाण्यातील एक अधिकारी व १० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे खा. आनंदराव अडसूळ यांचे नवसारी मार्गावरील निवासस्थान, आ.अनिल बोंडे यांचे राजापेठस्थित निवासस्थान, आ. सुनील देशमुख यांचे रूख्मिणीनगरातील निवासस्थान, आ. रवि राणा यांचे शंकरनगरातील घर, गणेडीवाल ले-आऊटमधील आ. यशोमती ठाकूर यांचे घर तसेच आ. श्रीकांत देशपांडे यांच्या निवासस्थानी, प्रत्येकी एक अधिकारी व पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त बुधवारी लावण्यात आला होता. मात्र, सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात शेतकऱ्यांचे आंदोलन झाल्याची वार्ता नव्हती.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता बघून लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
- अनिल कुरुळकर,
पीआय, विशेष शाखा.