मोझरी डायव्हर्शन प्रकल्प शासन दरबारी रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:13 IST2017-11-12T23:12:46+5:302017-11-12T23:13:04+5:30
आमला विश्वेश्वर येथे येणारा उर्ध्व वर्धा मोझरी डायव्हर्शन कालव्यासाठी ९ वर्षांपासून पाठपुरावा होत असला तरी त्याबाबत.....

मोझरी डायव्हर्शन प्रकल्प शासन दरबारी रखडला
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूररेल्वे : आमला विश्वेश्वर येथे येणारा उर्ध्व वर्धा मोझरी डायव्हर्शन कालव्यासाठी ९ वर्षांपासून पाठपुरावा होत असला तरी त्याबाबत अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे लेखी निवेदन सरपंच रजनी मालखेडे, ज्ञानेश्वर मालखेडे यांनी जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांना दिले. याबाबत प्रकल्पाला गती द्यावी, अशी चर्चा मंत्र्यांना करण्यात आली.
बबनराव गावंडे यांनी नेकनामपूर येथील जलपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ना. राम शिंदे व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्याशी विस्तृत चर्चा केली. मोझरी डायव्हर्शन कालव्यासाठी ९ वर्षांपासून तत्कालीन मंत्री छगन भुजबळ, ना. गिरीश महाजन, ना.प्रवीण पोटे पाटील, ना.गिरीश बापट, माजी आमदार अरुण अडसड, नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. सर्वांनी त्वरित मार्गी लावण्यात येईल, असे कळविले. परंतु प्रत्यक्षात याबाबत तांत्रिक मंजुरीअभावी गती आली नाही.
हा उर्ध्व कालव्यातून पाणीपुरवठा झाला, तर तिवसा व चांदूररेल्वे तालुक्यातील कोरडवाहू २१६३ हेक्टरला फायदा होऊन १२ गावांतील शेतकºयांना ओलितासाठी फायदा होऊन शेतकºयांचे समाधान होईल. याबाबत ना. राम शिंदे यांनी आमला पाथरगाव येथील नागरिकांना हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्याशी चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे सांगितले.