शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

अमरावतीमधील गोवर्धननाथ हवेलीला आग; चार दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:45 IST

अमरावती: रॉयली प्लॉट येथील सतीधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित व्यापारी संकुलातील चार दुकाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचा साहित्य जळून खाक झाले.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसानगर्दीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रॉयली प्लॉट येथील सतीधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित व्यापारी संकुलातील चार दुकाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचा साहित्य जळून खाक झाले. बघ्यांची गर्दी उसळल्यामुळे अग्निशमनला आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले.व्यापारी संकुलात राजू मिश्रा यांचे कामाक्षी लाइटस व सोना कलेक्शन नावाचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मिश्रा यांच्या पत्नी भावना दुकान उघडण्यासाठी गेल्या असता, त्यांना दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसले. या घटनेच्या माहितीवरून अग्निशमन कर्मचाऱ्यांनी एक बंब घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची भीषणता पाहून आणखी बंब बोलाविण्यात आले. काही वेळात अग्निशमनचे अधीक्षक भरतसिंग चव्हाण व ट्रान्सपोर्ट उपकेंद्र प्रमुख सैयद अन्वर यांच्यासह अन्य अग्निशमनचा ताफा पाण्याचे बंब घेऊन रॉयली प्लॉट परिसरात दाखल झाले. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी असल्यामुळे पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. यादरम्यान व्यापारी प्रतिष्ठानातील बहुतांश मुद्देमाल जळून खाक झाला होता. अखेर पाण्याच्या ११ बंबाचा वापर केल्यानंतर आग आटोक्यात आली. घटनेच्या माहितीवरून कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पीएसआय नरेश मुंढे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी बघ्यांची गर्दी कमी करून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना पांगवले.फायरमन सोनकांबळे जखमीघराच्या सजावटीसाठी उपयोगी पडणाऱ्या साहित्याच्या प्रतिष्ठान, गोडावून, रेडीमेड कपडे व ज्वेलरी शॉप अशा चार प्रतिष्ठाने आगीच्या भक्षस्थानी सापडले होते.

टॅग्स :fireआगAccidentअपघात