अमरावती: जिल्ह्यातील सर्वच कुटुंबाना राज्यशासनाकडून शौचालय बांधून देण्यात आलेले आहे.मात्र अद्यापही शाैचालय असल्यानंतरही अनेक गावात उघड्यावर शाैचास बसण्याची सवय बंद झालेली नाही. त्यामुळे सीईओ अमोल येडगे यांनी झेङपीचे गुडमॉनिंग पथक सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता सदर पथक १४ तालुक्यातील गावांमध्ये पुष्पगुच्छ देऊन कारवाई करणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाचे वैयक्तिक शौचालयाच्या स्थितीबाबत सन २०१२ मध्ये पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. सदर सर्वेक्षणाचे वेळी शौचालय नसलेल्या कुटुंबाना विविध उपक्रमाच्या माध्यमातून शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु अद्यापही काही ग्रामस्थ सवय किंवा अन्य कारणाने अद्यापही उघड्यावर
शौचास बसतात ही बाब गावाच्या सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणारी आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी गुडमॉनिंग व गुड इव्हिनिंग पथक कारवाई दंडुका उगारणार आहे. याकरिता प्रत्येक तालुक्यात पथक गठित केले आहेत.
बॉक्स
गावस्तरावर दक्षता समिती
ग्रामस्तरावर दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये स्वच्छाग्रही, आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सचिव, युवक-युवती आदीचा समावेश आहे.
बॉक्स
तालुकास्तरावर स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी,विस्तार अधिकारी (पं.) किंवा सहायक बीडीओंच्याच्या अध्यक्षतेखाली गुडमॉर्निग पथकाची स्थापना करण्यात आली. यात विस्तार अधिकारी यांची रोटेशन पध्दतीने दैनिक गुडमॉर्निग पथकात नियुक्ती केली आहे. याशिवाय समिती मध्ये तालुकास्तरावरील अंगणवाडी सुपरवायझर, बीआरसी,सीआरसी तसेच ग्राम स्तरावरील उक्त नमुद दक्षता,निगराणी समिती सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.