९१ वर्षांमध्ये दीड हजारपटीने वाढले ‘सोने’
By Admin | Updated: April 19, 2016 00:15 IST2016-04-19T00:15:32+5:302016-04-19T00:15:32+5:30
भारतीयांंमध्ये, विशेषत: भारतीय महिलांमध्ये सोने खरेदी आणि ते परिधान करण्याची भारी हौस आहे.

९१ वर्षांमध्ये दीड हजारपटीने वाढले ‘सोने’
खरेदीची क्रेझ कायमच : सन २०१५ मध्ये दर होते नीचांकी, बंदमुळे व्यवहार प्रभावित 
संदीप मानकर अमरावती
भारतीयांंमध्ये, विशेषत: भारतीय महिलांमध्ये सोने खरेदी आणि ते परिधान करण्याची भारी हौस आहे. हिंदू संस्कृतीत सोन्याला सर्वाधिक मागणी आहे. अगदी रामराज्याच्या काळातील रावणाच्या लंकेपासून सोन्याचे आकर्षण आहे. गेली ९१ वर्षांत सोन्याचे भाव तब्बल दीड हजारपटीने वाढले आहेत. 
१९२५ मध्ये १८ रुपये तोळा असलेले सोने आज २९ हजारांवर पोेहोचले आहे. २०१३ मध्ये सोने तेजीत होते ते ३३ हजार रुपये तोळा झाले होते. पण नोव्हेंबर २०१५ दरम्यान जागतिक मंदीमुळे अचानक सोन्याचे भाव कोसळले. ते २५ हजार २०० पर्यंत आले. हा आकडा म्हणजे या ६ वर्षांतला सर्वात निचांक होता. त्यानंतर बाजारपेठ सावरली व एप्रिल २०१६ पर्यंत २९ हजार २०० रु. भाव स्थिरावला. मात्र सोन्याच्या भाव वाढीच्या व गिरावटीचा परिणाम सोने विक्रेते व खरेदीदारांमध्ये फारसा फरक जाणवला नाही. २०१३ मध्ये सोने ३३ हजारांवर पोहोचले होते. दिवसागणिक सोने ‘भाव’ खात आहेत. 
पण म्हणतात ना, हौसेला मोल नसते, त्यामुळेच की काय कितीही भाव वाढला व कमी झाला तरी अमरावती जिल्ह्यात सोन्याच्या व्यवहारावर त्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. सहा महिन्यांत सोन्याचे भाव पडल्याने व आता वाढल्याने वर्षभरात आर्थिक मंदी होती. परंतु याही परिस्थितीत जिल्ह्यात दरमहा १०० कोटींच्या वर उलाढाल होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 
जगात सोन्याला सर्वाधिक मागणी भारतात आहे. गरीब असो की श्रीमंत, स्त्री असो की पुरुष भारतातील प्रत्येकाला सोन्याचे आकर्षण आहे. आज जगभरात मंदीचे सावट पसरले आहे. काही दिवसांतच सोन्याला झळाळी मिळाली. भाव कमी झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली. सोन्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आजही जिल्ह्यात लग्नानिमित्त व इतर सणानिमित्त दर दिवशी ३ ते ४ कोटी रुपयांच्या आसपास उलाढाल होत असल्याची माहिती आहे. 
सोन्याला शास्त्राचा आधार 
सोने हे मोठेपणाचे लक्षण मानले जाते. सोन्यांमुळे सौदर्यात भर पडते. 
शास्त्रात रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू, केतु या ग्रहांना हातात अंगठी करुन घालण्यासाठी मुख्य धातू हे सोने आहे. 
सोन्याला मोठा शास्त्रीय आधार आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याला महत्व आहे. त्यामुळे लोक सोने खरेदी करता, अशी माहिती ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी दिला. 
भारत,लंकेत सर्वाधिक सोने 
जगात सर्वाधिक सोने हे श्रीलंका आणि भारत देशात आहे. ते पुरातन काळापासूनच रामराज्याच्या युगात रावणाची लंका सोन्याची होती असे म्हणतात. पूर्वी भारताला सोने की चिडियां म्हण्तात होते. शिवाय भारतातून पूर्वी सोन्याचा शूर निघायचा असे ही म्हणायचे.
भारतीय संस्कृतीतही सोन्याला महत्व 
भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मात सोन्याला सारखेच महत्व आहे. सोने खरेदीकडे महिला वर्गाचा सर्वाधिक कल असतो. सोन्याचे आभूषणे सौंदर्य खुलवितात. अनादी काळापासून सोन्याचे महत्व आजतागायत कायम आहे. 
फक्त तीनदाच मोठा भाव उतार 
सन १९५० मध्ये सोन्याला ९९ रुपये तोळ्याचा भाव होता. त्यानंतर १९५५ मध्ये त्यात २० रुपयांची घट झाली. 
पुढे १९६० मध्ये १११ रुपयांवर पोहचला. मात्र त्याचवेळी अवघ्या दोन महिन्यात सोन्याचे भाव चाळीस रुपयाने उतरले. त्यानंतर ५२ वर्र्षानी म्हणजे २०१३ झाली ३३ हजारांवर तोळा मागे सोन्याचे भाव वाढले होते. पण नोव्हेंबर २०१५ मध्ये भाव अचानक पडले व २५ हजारांवर आले. तोळ्यामागे ८००० रुपयांचे ही सर्वात मोठी घसरण होती मार्च २०१६ पर्यंत. ४००० रुपयांची वाढ होऊन २९ हजारांवर सोने आले आहे. या वर्षात वाढ होण्याची शक्यता आहे. 
सोनेरी वर्षे 
सन १९२५ ते १९७० या कालावधीत सोन्याचे भाव कासवगतीने वाढत होते. मात्र १९७५ मध्ये सोन्याचे भाव अचानक वाढले. 
१४८ रुपये तोळ्यावरुन हा भाव प्रति तोळा ५४० रुपयांवर गोला ही सर्वात मोठी वाढ ठरली. त्यानंतर २०१० सालाी सोने १८ हजार १५० रुपये तोळा होते. ६ वर्षात मोठी वाढ झाली. 
जिल्ह्यात दागिन्यांची ८०० दुकाने 
जिल्ह्यात सोन्या-चांदीची एकूण ३०० ते ३५० दुकाने आहेत, तर सुवर्णकारांची ३३० ते ४०० दुकाने आहेत. या दुकानांमध्ये लाखों रुपयांची उलाढाल होते. सुवर्णकार संघटना व सराफा असोसिएशन जिल्ह्यात कार्यरत आहेत. अबकारी कराच्या मुद्यावरून अनेक दिवस दुकाने बंद होती.
बाजारपेठेत सर्वत्र मंदीचे सावट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्के व्यवसाय झाला आहे. सरकारने सोन्यावर एक्साईज ड्युटी लावल्यामुळे सराफा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. लग्नसराईत बाजारपेठ मंदावली आहे. सरकारच्या धोरणामुळे भाववाढ होऊ शकते.
- समीर कुबडे,
सदस्य, सराफा असोसिएशन
जरी भाववाढ स्थिरावली असली तरी लोकांची खरेदी कमी आहे. बाजारपेठेत मंदी असल्याने लग्नसराईच्या काळात त तेजी येण्याची शक्यता आहे. 
- अनिल काटोले, 
सदस्य, सुवर्णकार संघटना
सोन्याची भाववाढ विदेशी बाजारपेठेवर अवलंबून आहे. भारतात जर सोन्याची आयात झाली तर भाववाढ होते. पण सद्यस्थितीत जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचे सावट आहे. 
- विनय दोशी,
चार्टर्ड एकाऊंटंट, अमरावती