सुप्त इच्छा पुरविणारी इच्छापूर्ती देवी

By Admin | Updated: October 21, 2015 00:20 IST2015-10-21T00:20:07+5:302015-10-21T00:20:07+5:30

मूर्तिजापूर मार्गावर असलेले गणेशपूर येथील इच्छापूर्ती माता देवस्थान खरोखरीच इच्छांची पूर्तता करणारे देवस्थान ठरले आहे.

Goddess Durga wants to provide sleeping wishes | सुप्त इच्छा पुरविणारी इच्छापूर्ती देवी

सुप्त इच्छा पुरविणारी इच्छापूर्ती देवी

गणेशपूरचे वैभव : नवरात्रीत भक्तांचा राबता, विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
उमेश होले दर्यापूर
मूर्तिजापूर मार्गावर असलेले गणेशपूर येथील इच्छापूर्ती माता देवस्थान खरोखरीच इच्छांची पूर्तता करणारे देवस्थान ठरले आहे. भाविकांच्या अनेक मनोकामना या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर पूर्ण होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत, असा विश्वास भाविकांचा आहे.
ही मूर्ती संगमरवरी दगडापासून तयार केलेली असून मंदिरात स्थानापन्न झाली आहे. इच्छापूर्ती देवी ही वऱ्हाडातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिराला भेट देण्याकरिता व इच्छामूर्तीमातेच्या दर्शनाकरिता भाविक नवरात्रीत या मंदिरात गर्दी करतात. गणेशपूर हे छोटेसे गाव आहे. या गावात निसर्गरम्य वातावरणात इच्छापूर्ती मातेच मंदिर स्थित आहे. वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी असते. येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मदनगोपाल पनपालिया चॅरीटेबल ट्रस्टव्दारे हे मंदिर चालविण्यात येते. मंदिराची स्थापना स्व. विठ्ठलदास पनपालिया यांनी सन २००४ मध्ये केली. मंदिराची उंची ७१ फूट असून मंदिरावर कळस बसविण्यात आला आहे. संगमरवरी दगडाचे राजस्थानी बनावटीचे हे मंदिर आहे. ते तयार करण्यासाठी खास राजस्थानाहून कारागीर येथे आणण्यात आले होते. या मंदिराची लांबी ४५ फूट आहे. इच्छापूर्ती मातेची मूर्ती सहा फूट उंच आहे. मंदिराची रचना सुरेख आहे.

Web Title: Goddess Durga wants to provide sleeping wishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.