‘करविरहित मालमत्ता’ शोधण्याचे लक्ष्य

By Admin | Updated: October 25, 2016 00:08 IST2016-10-25T00:08:37+5:302016-10-25T00:08:37+5:30

महापालिकेला आर्थिक विपन्नावस्थेतून बाहेर काढण्यासाठी शहरातील ‘अनअसेस प्रॉपर्टीज’ (करविरहित मालमत्ता) शोधण्याकडे लक्ष वळविण्यात आले आहे.

The goal of finding 'taxless property' | ‘करविरहित मालमत्ता’ शोधण्याचे लक्ष्य

‘करविरहित मालमत्ता’ शोधण्याचे लक्ष्य

करवसुलीसाठी आयुक्तांचे निर्देश : झोन कार्यालयात अर्ज उपलब्ध
अमरावती : महापालिकेला आर्थिक विपन्नावस्थेतून बाहेर काढण्यासाठी शहरातील ‘अनअसेस प्रॉपर्टीज’ (करविरहित मालमत्ता) शोधण्याकडे लक्ष वळविण्यात आले आहे. एकीकडे महापालिकेतील एडीटीपी विभाग तिजोरीत भर पाडत असताना कर विभागालाही ५० कोटी प्लसचे लक्ष्य देण्यात आले. त्याअनुषंगाने सोमवारी आयुक्त हेमंत पवार यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यात करवसुलीसंदर्भात सक्त निर्देश दिले आहेत.
अमरावती महापालिका क्षेत्रात अंदाजे दीड लाख मालमत्ता कर देणाऱ्या आहेत. त्यापैकी १.५० लाख मालमत्ताधारकांकडून कर वसूल करण्यात येतो. सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक मालमत्ता कराच्या अखत्यारित नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षापासून मालमत्ताकरात वाढ झालेली नाही.
याअनुषंगाने आयुक्तांनी साधकबाधक आढावा घेऊन कराच्या अखत्यारीत न आलेल्या मालमत्ता शोधून काढून संबंधितांकडून कर वसूल करण्याचे निर्देश दिलेत. ज्या मालमत्तांचे असेसमेंट झाले नाही, त्या मालमत्ता शोधण्याचे आव्हान करविभागाला पेलावयाचे आहे. याशिवाय ज्या मालमत्तांचे ‘असेसमेंट’ झाले; मात्र घराची व्याप्ती वाढविल्यानंतरही कर मात्र तेवढाच राहिला आणि ज्या मालमत्तांचे असेसमेंट झाले मात्र त्या इमारतीचा वापर बदलला अशा सर्व मालमत्ता कराच्या अखत्यारीत आणण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. त्या अनुषंगाने थकबाकीच्या वसुलीसाठी करविभागासह सहायक आयुक्तांना दिशानिर्देश देण्यात आले. त्याबाबत विभागप्रमुखांची बैठक घेतली. मालमत्ता धारकांकडून दंड वसूल केला जाणार नाही.
- हेमंत पवार, महापालिका आयुक्त.

Web Title: The goal of finding 'taxless property'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.