छायाचित्र स्पर्धेतील चिमुकल्यांचा गौरव
By Admin | Updated: March 14, 2015 00:27 IST2015-03-14T00:27:31+5:302015-03-14T00:27:31+5:30
स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन व बालकदिनी चिमुकल्यांची छायाचित्रे प्रकाशित करण्याच्या ‘लोकमत’द्वारे यंदा राबविण्यात आलेल्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

छायाचित्र स्पर्धेतील चिमुकल्यांचा गौरव
लोकमत उपक्रम
अमरावती : स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन व बालकदिनी चिमुकल्यांची छायाचित्रे प्रकाशित करण्याच्या ‘लोकमत’द्वारे यंदा राबविण्यात आलेल्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच अनुषंगाने काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना २३ मार्च रोजी पुरस्कृत केले जाईल. दु. ४ वाजता हा कार्यक्रम पवार फोटो स्टुडिओत आयोजित केला जाईल. पवार फोटो स्टुडिओचे या उपक्रमांमध्ये विशेष सहकार्य असते.
स्वातंत्र्य दिन १५ आॅगस्ट व प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला आणि १४ नोव्हेंबरला म्हणजेच बालकदिनी चिमुकल्यांचे उत्साहवर्धन करण्याच्या उद्देशाने त्यांची छायाचित्रे प्रकाशित केली जातात. या छायाचित्रांमधून लकी ड्रॉ द्वारे उत्कृष्ट छायाचित्रांची निवड केली जाते. त्यातून विजेत्या स्पर्धकांना पुरस्कृत केले जाते. यंदाच्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना २३ मार्च रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सन्मानित केले जाईल. ‘लोकमत’च्या या अभिनव उपक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वार्ताहरांचाही यावेळी गौरव केला जाईल. (प्रतिनिधी)