पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:21+5:302020-12-30T04:17:21+5:30
अमरावती : सोशल मीडियावर मुलींचे फोटो अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या शासकीय वाहनात पोलीस घेऊन जात असताना, त्या ठिकाणी चार ...

पोलिसांच्या वाहनाच्या काचा फोडल्या
अमरावती : सोशल मीडियावर मुलींचे फोटो अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या शासकीय वाहनात पोलीस घेऊन जात असताना, त्या ठिकाणी चार युवक आले. आरोपीला ताब्यात द्या, असे म्हणून पोलिसांशी त्यांनी हुज्जतबाजी घातली व त्यानंतर सेंट्रिंगच्या लाकडी राप्टरने वाहनावर हल्ला चढवून चालकाच्या साईडच्या काचा फोडल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली.
हेडकॉन्स्टेबल प्रमोद खरबडे यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी चार युवकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. टाकळी जहागीर येथे ही घटना घडली. पोलिसांच्या एमएच१२ पीक्यु ३५०९ या वाहनात बसवून आरोपी इरफान शेख मुसा याला गावातून पोलीस ठाण्यात आणले जात असताना, चार युवक त्या ठिकाणी पोहोचले. आरोपीला ताब्यात देण्यास पोलिसांकडून नकार मिळाल्यानंतर युवकांनी पोलिसांच्या वाहनाच्या कचा फोडल्या यात पोलिसांच्या वाहनाचे पाच हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी भादंविचे कलम ३५३,१८६,३४ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ अन्वये गुन्हा नोंदविला.