महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्या
By Admin | Updated: August 4, 2016 00:17 IST2016-08-04T00:17:09+5:302016-08-04T00:17:09+5:30
राज्यभर १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्या
जिल्हाधिकारी : महिला सक्षमीकरण सप्ताह
अमरावती : राज्यभर १ ते ७ आॅगस्ट दरम्यान महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात जमिनी संदर्भातील वादात महिलांना कमी न्याय मिळाल्याचे निदर्शनास येते यासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिलेखे तपासून महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्यावेत, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त किरण गित्ते यांनी दिले. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय महसूल दिन, महिला सक्षमीकरण सप्ताह कार्यक्रमांतर्गत अमरावती महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, महसुल उपायुक्त प्रवीण पुरी, उपायुक्त पुरवठा रमेश मावसकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक आयुक्त ओमप्रकाश अग्रवाल, सहायक आयुक्त जयंत अपाले, परिविक्षाधिन आयएएस राहुल कर्डिले, माजी महापौर किरणताई महल्ले आदी उपस्थित होते. यावेळी गित्ते यांच्या हस्ते उपस्थित महिलांना मानवी हक्क अभिलेख व प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका, सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, घाटंजीचे तहसीलदार जोरवाल, तहसीलदार श्रीकांत उंबरकर, नायब तहसीलदार राहुल वानखडे, अव्वल कारकुन उमेश निमकाळे, लिपिक सचिन बागडे, लघुलेखक महेंद्र गायकवाड, रमेश मोहोड, चंद्रकांत धकिते, मंडल अधिकारी ए.एन.डवळे, अमोल देशमुख, तलाठी महेश धानोरकर, प्रवीण कावलकर, पोलिस पाटील डी.बी.वानखडे, कोतवाल दिनकर गवई, आर.के.खरात, आर.बी.नेरकर, विजय सूर्यवंशी, रमेश मोरे, अशोक जाधव आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी किरण महल्ले, बुलडाणाचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसूलदार वैशाली पाथरे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)