स्काय वॉकसाठी केंद्र सरकारला बुद्धी दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST2021-07-18T04:10:54+5:302021-07-18T04:10:54+5:30

कॅप्शन - स्काय वॉकसंदर्भात यज्ञ करताना युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल येवले, यशवंत काळे, पीयूष मालावीय -------------------- मेळघाट युवक ...

Give wisdom to Central Government for Sky Walk | स्काय वॉकसाठी केंद्र सरकारला बुद्धी दे

स्काय वॉकसाठी केंद्र सरकारला बुद्धी दे

कॅप्शन - स्काय वॉकसंदर्भात यज्ञ करताना युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल येवले, यशवंत काळे, पीयूष मालावीय

--------------------

मेळघाट युवक काँग्रेसचे चिखलदऱ्यात सद्बुद्धी महायज

चिखलदरा : जगातला तीसरा व देशातील प्रथम स्काय वॉकचे काम विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथे सुरू आहे. सुमारे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. सूडभावनेने केंद्रीय पर्यावरण खात्याने अटी-शर्तींच्या नावाखाली महत्त्वपूर्ण कामात अडथळे आणायला सुरुवात केली असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्यावतीने याच ठिकाणी सद्बुद्धी महायज्ञ शनिवारी दुपारी करण्यात आले.

युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल येवले, मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत काळे, उपाध्यक्ष पीयूष मालवीय, तुषार गायन, अमित बेलकर, संतोष गायन, शुभम घोरे, घनश्याम सगने आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आला होता. यादरम्यान यज्ञासाठी विधिवत पूजाअर्चासुद्धा ब्राह्मणाकरवी करण्यात आली.

Web Title: Give wisdom to Central Government for Sky Walk