जहांगीर आर्ट गॅलरीत मेळघाटला जागा द्या

By Admin | Updated: July 21, 2015 00:14 IST2015-07-21T00:14:53+5:302015-07-21T00:14:53+5:30

मेळघाटचे निसर्ग सौंदर्य जगप्रसिद्ध आहे. वन संपत्तीने नटलेला मेळघाट प्रसिद्धी व प्रचाराअभावी उपेक्षित आहे.

Give space to Melghat in Jahangir Art Gallery | जहांगीर आर्ट गॅलरीत मेळघाटला जागा द्या

जहांगीर आर्ट गॅलरीत मेळघाटला जागा द्या

 मागणी : अमरावती प्रेस फोटोग्राफरचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अमरावती : मेळघाटचे निसर्ग सौंदर्य जगप्रसिद्ध आहे. वन संपत्तीने नटलेला मेळघाट प्रसिद्धी व प्रचाराअभावी उपेक्षित आहे. मेळघाटचे सौंदर्य, त्याच्या विविध निसर्गछटा, वन्यजीव, वनस्पती, मेळघाटचा महाभारतापासून विराट राजापर्यंतचा असलेला आकर्षक सुंदर इतिहास आहे. त्यामुळे मेळघाटात जहागीर आर्ट गॅलरीसाठी जागा देण्याची मागणी येथील प्रेस फोटोग्राफरच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
मेळघाटचे सौंदर्य मुंबईतील जहांगिर आर्ट गॅलरीत छायाचित्राद्वारे प्रदर्शन करण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास विदर्भातील या निसर्ग सौंदर्याच्या खजिन्याची देशपातळीवर दखल घेतली जाईल. शिवाय वैदर्भिय छायाचित्रकारांना नवे आणि मोठे व्यासपीठही उपलब्ध होईल.
त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी जहांगिर आर्ट गॅलरीत मेळघाटसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असा आग्रह अमरावती प्रेस फोटोग्राफर्सच्यावतीने अध्यक्ष मनीष जगताप, सचिव मनिष तसरे, कोषाध्यक्ष अरुण जोशी, वैभव दलाल, खोजयमा खुर्रम, शशांक नागरे, सईद खान, शेखर जोशी, सी.बी.धुमटकर, राजकुमार मनोजा, दीपक मेहता, समीर अहमद, भूषण जोशी व सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून धरला. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनावर विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Give space to Melghat in Jahangir Art Gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.