महापालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना घर टॅक्स सवलत द्या
By Admin | Updated: December 13, 2015 00:13 IST2015-12-13T00:13:06+5:302015-12-13T00:13:06+5:30
सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे.

महापालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना घर टॅक्स सवलत द्या
मागणी : आयुक्तांना युवक काँग्रेसचे निवेदन
अमरावती : सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर असतानाही मुलांच्या शिक्षणासाठी शहरात असलेल्या शेतकरी वर्गाला महापालिकेने घर टॅक्समध्ये सवलत द्यावी, अशी मागणी शनिवारी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांपासून सलग दुष्काळी परिस्थितीने शेतकरी आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. यंदाही हीच परिस्थिती असल्याने अशाही स्थितीत शेती उत्पन्नाचा एकमेव आर्थिक कणा असलेल्या उत्पन्नातूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कुटुंबाचा सांभाळ व मुलांचे शिक्षण कसे करावे हा प्रशन भेडसावत आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी ग्रामीण भागात शेती करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवित शहरात वातव्य करीत आहेत, त्यांना घरटॅक्स सवलत द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे महासचिव सागर देशमुख, राष्ट्रीय महासचिव भय्या पवार, विवेक हरणे, सागर यादव, आशिष यादव, मुकेश लालवाणी, राहुल येवले, गौरव पवार, विलास डेडूले, आदित्य पेलागडे, रवी चिंचमलातपुरे, जहीर अहेमद, कुणाल गायगोले, चेतन घोगरे, आनंद केने, सचिन राठोड, ज्ञानेश्र्वर काळे, विशाल देशमुख आदींनी केली आहे.