गोरबोलीला राज्य भाषेचा दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:37 IST2021-01-08T04:37:19+5:302021-01-08T04:37:19+5:30
फोटो जे-७- नवनीत राणा नावाने अमरावती : बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार नवनीत राणा ...

गोरबोलीला राज्य भाषेचा दर्जा द्या
फोटो जे-७- नवनीत राणा नावाने
अमरावती : बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नुकतीच केली.
गोर बंजारा समाजाची लोकसंख्या १० कोटींवर असून, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आदी राज्यांत वास्तव्यास आहेत. बंजारा समाज आदिम जमातीपासून अस्तित्वात असून त्यांची वेगळी संस्कृती उदयास आलेली आहे. त्यामुळे पूर्वी जंगलात समूहाने वास्तव्य करणारा हा समाज कालांतराने तांडा-वस्तीत राहू लागला आणि आता व्यवसाय, नोकरीनिमित्त शहरांसह देश-विदेशात पोहोचल्याने आपल्या ऐपतीनुसार कॉलनी, नगरात वास्तव्य करीत आहे. मात्र, त्यांची बोलीभाषा अजूनही तीच आहे. त्यामुळे बंजारा बोली भाषेला राज्य भाषेचा दर्जा देऊन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषद, राष्ट्रीय अध्यक्ष किसन राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद अमरावती जिल्हाध्यक्ष कैलास राठोड व जिल्हा सचिव धारुसिंग चव्हाण, कार्याध्यक्ष अशोक राठोड, उपाध्यक्ष मोहन चव्हाण व मुकेश चव्हाण, कोषाध्यक्ष बालकदास जाधव, जिल्हा संघटक सुभाष चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख राजकुमार जाधव, सहसचिव जगन जाधव उपस्थित होते.