आशा वर्करला रोजचा ३०० रुपये भत्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:12 IST2021-05-13T04:12:48+5:302021-05-13T04:12:48+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाचे काळात आशा वर्करची महत्वाची भूमिका आहे. जीवावर उदार होऊन कामे करीत असल्याने या कर्मचाऱ्यांना रोज ...

आशा वर्करला रोजचा ३०० रुपये भत्ता द्या
अमरावती : कोरोना संसर्गाचे काळात आशा वर्करची महत्वाची भूमिका आहे. जीवावर उदार होऊन कामे करीत असल्याने या कर्मचाऱ्यांना रोज किमान ३०० रुपये भत्ता देण्याची मागणी भीम ब्रिगेडद्वारा महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
सद्यस्थितीत आशा वर्कर यांची नेमणूक लसीकरण केंद्रावर करण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नावनोंदणी, ज्येष्ठ नागरिक यांना आधार देऊन लसीकरणासाठी आणणे. वेळ असल्यास बसावयास लावणे. सकाळी ९ ला आलेली आशा वर्कर सायंकाळी ७ वाजता घरी जाते. त्याचवेळी शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात येत आहे. एएनएम यांना ५०० रुपये रोज व संगणक ऑपरेटरला ३९० रुपये देत असताना आशा वर्कर यांना अल्पसा मानधन आहे. त्यामुळे त्यांना रोजचे किमान ३०० रुपये देण्यात यावे, अशी मागणी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.