सेतू संचालक, आधार ऑपरेटर यांना कोविड व्हॅक्सिन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST2021-03-01T04:14:46+5:302021-03-01T04:14:46+5:30

चिखलदरा : जिल्हाभरातील सेतु संचालक व आधार कार्ड दिवसभरात शेकडो लोकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ...

Give covid vaccine to bridge director, Aadhaar operator | सेतू संचालक, आधार ऑपरेटर यांना कोविड व्हॅक्सिन द्या

सेतू संचालक, आधार ऑपरेटर यांना कोविड व्हॅक्सिन द्या

चिखलदरा : जिल्हाभरातील सेतु संचालक व आधार कार्ड दिवसभरात शेकडो लोकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी संचालकांना कोरोना व्हॅक्सिन दुसऱ्या टप्प्यात देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

कुठलेही शासकीय काम असल्यास सेतु केंद्रावर दररोज नागरिकांची गर्दी ही सर्वश्रुत आहे. आधार ऑपरेटर म्हटल्यावर येणाऱ्या ग्राहकांशी शारीरिक अंतर ठेवणे अशक्य नाही. आधार काढताना किंवा अपडेट करताना दिवसातून किमान ५० ते १०० लोकांशी प्रत्यक्ष संपर्क येतो. वरील बाबींचा विचार करता, कोरोना संक्रमण होण्याचा किंवा ऑपरेटर किंवा संचालकांना झाल्यास त्यांच्यापासून इतर लोकांना संक्रमित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी कोरोना व्हॅक्सिनच्या दुसऱ्या टप्प्यात सेतू संचालक, ऑपरेटर, आधार ऑपरेटर त्यांना देण्याची मागणी संचालक पीयूष मालवीय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

Web Title: Give covid vaccine to bridge director, Aadhaar operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.