कुडकुडणाऱ्या जीवांना देऊ या ऊब
By Admin | Updated: December 21, 2015 00:02 IST2015-12-21T00:02:07+5:302015-12-21T00:02:07+5:30
आता थंडीने जोर धरला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत शहरात अनेक बेघर, अनाथ, गरजू जीव अनेक ठिकाणी कुडकुडताना आढळतात.

कुडकुडणाऱ्या जीवांना देऊ या ऊब
लोकमत, वाचकांचा उपक्रम : घरातील लोकरीचे कपडे देण्याचे आवाहन
अमरावती : आता थंडीने जोर धरला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत शहरात अनेक बेघर, अनाथ, गरजू जीव अनेक ठिकाणी कुडकुडताना आढळतात. आपल्या घरात पडून असलेल्या जुन्या उबदार कपड्यांमधून अशा गरजू, निराधारांना ऊब दिली जाऊ शकते. लोकमत वृत्तपत्र समूह व वाचकांना अशा अनाथ, गरजू, वृध्द आणि असहाय्य अवस्थेतील लोकांसाठी उपक्रम राबविण्याचे ठरविले असून या गरजुंना घरातील कपड्यांची ऊब देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लहान मुले तसेच मोठ्यांना वापरता येतील असे गरम, उबदार आणि सुस्थितीतील स्वच्छ कपडे जसे स्वेटर, मफलर, स्कार्फ, चादरी, शाली, ब्लँकेट आदी इच्छुकांनी लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड अमरावती, येथे २५ डिसेंबरपर्यंत जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. गोळा झालेल्या या उबदार कपड्यांचे गरजुंना वितरण करण्यात येईल. वाचकांनी या उपक्रमाला हातभार लावावा व आपल्या घरातील एकतरी गरम ऊबदार कपडा थंडीत कुडकुडणाऱ्या लोकांना द्यावा. विविध सेवाभावी संस्थांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी स्वाती बडगुजर (९८५०३०४०८७) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘प्रेमाने ऊब द्या ’ उपक्रमात सहभागी महिला
या उपक्रमात भावना कुदळे, व्हीएचपी मातृशक्ती महानगर ग्रुप, माधुरी जोशी, ममता कर्नावर, ओसवाल महिला मंडळ, स्मिता पच्चीकर, गुजराथी समाज महिला मंडळ, नीता मुंदडा माहेश्वरी महिला मंडळ, संगीता खंडेलवाल, खंडेलवाल महिला मंडल, प्रतिभा सकलेचा, ओसवाल बहुसंघ, राणी चौधरी, ललिता कात्रेला, ओसवाल महिला संघ, संजना आंचलिया, विदर्भ महिला अध्यक्ष, भारतीय जैन संघटना, भारती हिंजोचा, लोहाणा महिला मंडळ, संगीता दासानी, जया हरवानी, मममता दादलानी, हसिना शहा, हीम सोसायटी, वैशाली गुल्हाने, ममता काकाणी, उज्ज्वला मालू या महिला व महिला संघटना सहभागी झाल्या आहेत.