डॉ.भाऊसाहेब देशमुखांना भारतरत्न द्या
By Admin | Updated: December 22, 2015 00:11 IST2015-12-22T00:11:46+5:302015-12-22T00:11:46+5:30
शिक्षणमहर्षी, स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन ...

डॉ.भाऊसाहेब देशमुखांना भारतरत्न द्या
शेखर भोयर : राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरी व्हावी जयंती
अमरावती : शिक्षणमहर्षी, स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन मरणोपरांत गौरविण्यात यावे आणि त्यांचा २७ डिसेंबर हा जन्मदिन राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केली आहे.
शेतीच्या विकासासाठी आणि आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण धोरणांची अंमलबजावणी करून कृषी क्षेत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आंतरराष्ट्रीय कृषी परिषदेमध्येसुध्दा त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी शेतीच्या विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी अनेक कृषी महाविद्यालयांची स्थापना केली. शिवाय त्यांनी संपूर्ण देशात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविली. बहुजनांना व समाजातील तळागाळातील लोकांना मोफत शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊसाहेबांनी शैक्षणिक क्रांतीची बिजे रोवल्यामुळेच बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार मिळाला. त्यांनी कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले उत्तुंग कार्य लक्षात घेता त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करायलाच हवे, असेही शेखर भोयर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.