जाळ्यात फसल्या नाही म्हणून मुलींची समाज माध्यमावर बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST2021-07-20T04:10:43+5:302021-07-20T04:10:43+5:30
अमरावती : कुऱ्हा येथील दोन मुलींना गावापासून कैक किलोमीटर दूर असलेले तीन युवक त्रस्त करीत आहेत. एकाने समाज माध्यमावर ...

जाळ्यात फसल्या नाही म्हणून मुलींची समाज माध्यमावर बदनामी
अमरावती : कुऱ्हा येथील दोन मुलींना गावापासून कैक किलोमीटर दूर असलेले तीन युवक त्रस्त करीत आहेत. एकाने समाज माध्यमावर बजनामीकारक मजकूर व्हायरल केला आहे. यापैकी दोघांना याआधी पोलिसांत दिले होते. त्यानंतरही त्यांच्या कारवाया थांबल्या नसल्याने पालकांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी येथील रहिवासी असलेल्या एका युवकाने कुऱ्हा येथील एका मुलीला कह्यात घेतले व त्याचा आप्त असलेल्या त्याच गावातील अन्य युवकासाठी तिच्या जवळच्या नात्यातील मुलीला गळाला लावण्यास सांगितले. या प्रकरणातील भयावहता लक्षात येताच पालकांना सांगून या मुलींनी दोन्ही युवकांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर मात्र मुलींच्या नात्यातील सावंगी रेल्वे (ता. दारव्हा) येथील एका युवकाने व्हॉट्सॲपवर बदनामीकारक मजकूर टाकून या मुलींची बदनामी चालविली आहे. याबाबत कुऱ्हा पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दिली असून कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.