मुलीला फूस लावून पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST2021-04-14T04:12:17+5:302021-04-14T04:12:17+5:30

--------- महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण धारणी : तालुक्यातील भंवर या गावी ४५ वर्षीय महिलेच्या दुकानात शिरून प्रवीण दयाराम भिलावेकर ...

The girl was lured away | मुलीला फूस लावून पळविले

मुलीला फूस लावून पळविले

---------

महिलेचा विनयभंग, पतीला मारहाण

धारणी : तालुक्यातील भंवर या गावी ४५ वर्षीय महिलेच्या दुकानात शिरून प्रवीण दयाराम भिलावेकर या इसमाने तिचा हात पकडला. पाठविलेल्या व्यक्तीकडे सामान का दिले नाही, असे विचारत त्याने तिच्याशी ओढाताण केली. यात खांद्यावरील कापड फाटले. पतीलाही त्याने लाथ मारली. धारणी पोलिसांनी भादंविचे कलम ३५४ ई, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला.

-----------

रेती वाहून नेणारा ट्रक पकडला

ब्राह्मणवाडा थडी : टाकरखेडा पूर्णा येथील जिल्हा परिषद शाळेनजीक रेती वाहून नेणारा एमएच ०४ सीजी २१४९ क्रमांकाचा मिनीट्रक आसेगाव पूर्णा पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने पकडला. रेतीसह २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी फिरोज अफारखाँ पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

--------

भंडारज शिवारात गव्हाचे पीक जळाले

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील भंडारज शिवारात माधव वासुदेव गिते (६५) यांच्या शेतातील गव्हाचे पीक ११ एप्रिल रोजी जळाले. त्यांच्या शेतातून वीजपुरवठा गेलेला नाही. त्यामुळे ही आग खोडसाळपणाने लावल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: The girl was lured away