विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या जावयाला अटक
By Admin | Updated: June 21, 2014 01:14 IST2014-06-21T01:14:04+5:302014-06-21T01:14:04+5:30
सासुरवाडीला आलेल्या जावयाने गावातील विद्यार्थिनीची छेड काढली.

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या जावयाला अटक
अचलपूर : सासुरवाडीला आलेल्या जावयाने गावातील विद्यार्थिनीची छेड काढली. लोकांच्या लक्षात ही बाब येताच त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
आरोपी जावयाचे नाव मोहंमद वकील शेख इस्माईल (३७,रा. बैरागड) असे आहे. त्याची सासुरवाडी अचलपूर येथील बोरियापुरा येथे आहे. आरोपी बोरियापुरा येथेच राहतोे. अचलपूर येथील गांधीपूल परिसरात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मोहंमद वकील आठवडाभरापासून पाठलाग करीत होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्याने तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला. याबाबत विद्यार्थिनीने सरमसपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोेंदविली. दरम्यान मुलीच्या काकाने व काही लोकांनी मोहंमद वकील याला चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले.
विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून सरमसपुरा पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४(ड) अन्वये गुन्हा नोंदविला. मोहंमद वकिलला अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यासमोर बघ्यांची गर्दी उसळली होती. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. चवरे यांच्या मार्गदर्शनात हेकाँ. संजय हुतके, विलास आवारे, संतोष जायभाये करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)