शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धारणीच्या तरूणाकडून अमरावतीकर तरूणीचे लैंगिक शोषण, मारहाण

By प्रदीप भाकरे | Updated: June 2, 2023 16:26 IST

तीन वर्षांच्या प्रेमसंबंधांचा अकाली शेवट

अमरावतीधारणी येथील एका २५ वर्षीय तरुणाने येथील एका १९ वर्षीय तरूणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. २४ नोव्हेंबर २०२२ रोजीनंतर वारंवार त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. याप्रकरणी पिडिताच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी राणा राजा कुरेशी (२५, रा. धारणी) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, यातील फिर्यादी १९ वर्षीय तरूणी व आरोपी राणा हे दोघे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आरोपीचे फिर्यादीच्या अमरावती येथील घरी येणे जाणे होते. त्यादरम्यान दोघांमधील ओळख अधिक घट्ट होऊन त्यांच्यातील संवाद वाढला. त्याने तिला प्रपोझ केले. त्याला तिने देखील होकार दिला. तब्बल तीन वर्ष त्यांच्यात प्रेमसंबंध होते.

दरम्यान, २४ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी दिडच्या सुमारास ती राजकमल चौक येथे शॉपिंगला गेली असताना आरोपी राणा तिला तेथे भेटला. मला तुझ्याशी बोलायचे आहे. सोबत मित्राच्या घरी चल, अशी बतावणी त्याने केली. त्यामुळे ती त्याच्या दुचाकीवर बसली. त्याने तिला साईनगर येथील एका महिलेच्या घरातील रूममध्ये नेले. अचानक तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्यासाठी जबरदस्ती केली. नकार दिला असता त्याने तिला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यावेळी ती खुप रडली.

आईने विचारला जाब, दिला धीर

अचानक घडलेल्या त्या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली. तिच्या त्या घाबरलेल्या अवस्थेचा गैरफायदा घेत त्यानी तिला अनेकदा धमकावले. तथा वारंवार तिचे लैंगिक शोषण केले. तिला मारहाण देखील केली. दरम्यान, तो प्रकार तिच्या आईला समजताच तिला जाब विचारण्यात आला. तिने आईजवळ संपुर्ण आपबिती कथन केली. त्यानंतर तिच्या आईने तिला धीर दिला. त्यामुळे तिने ३१ मे रोजी रात्री राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी १ जून रोजी रात्री एकच्या सुमारास गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती