‘त्या’ कुमारी मातेच्या प्रियकराला अटक

By Admin | Updated: July 26, 2016 00:31 IST2016-07-26T00:31:22+5:302016-07-26T00:31:22+5:30

अंजनगाव-दर्यापूर मार्गावरील एका संकुलात गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या त्या कुमारी मातेच्या प्रियकराला सोमवारी कुमारी मातेच्या बयानावरून अटक केली.

'That' girl arrested for the mother's love | ‘त्या’ कुमारी मातेच्या प्रियकराला अटक

‘त्या’ कुमारी मातेच्या प्रियकराला अटक

खळबळ : अंजनगाव येथील अर्भक प्रकरण
अंजनगाव सुर्जी : अंजनगाव-दर्यापूर मार्गावरील एका संकुलात गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या त्या कुमारी मातेच्या प्रियकराला सोमवारी कुमारी मातेच्या बयानावरून अटक केली.
शहरातील विकास प्लाझा या संकुलात बाळाला जन्म देऊन कुमारी मातेने पलायन केले होते. त्या अल्पवयीन मातेचा शोध घेऊन तिच्या बयाणावरून कमलेश श्रीकृष्ण दाभाडे (२०,रा. रहिमापूर फाटा) या प्रियकराला रहिमापूर पोलिसांनी अटक केली. आरोपी विरोधात भादंविच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्या मातेवर नवजात अर्भकास जन्म देवून पळून गेल्या प्रकरणी भादंवि ३१७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कुमारी मातेची प्रकृती खराब झाल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास रहिमापूर पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

डीएनए चाचणी होणार
या घटनेतील बाळाला जन्म देणाऱ्या कुमारी मातेची, आरोपी प्रियकर तसेच मृत पावलेल्या बाळाची डीएनए चाचणी व रक्तातील नमुन्यानुसार होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: 'That' girl arrested for the mother's love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.