शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रहार’च्या भावना आरपारच्या, तोडाफोड करून बाहेर पडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2022 23:51 IST

आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आमदार रवि राणा व बच्चू कडू यांच्यातील वाद हा शिगेला पोहोचला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रविवारी या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत. काय आहे ते तोडाफोड करून बाहेर निघणार, असा गौप्यस्फोट आमदार बच्चू कडू यांनी रविवारी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्री ८ वाजता मुंबईला निघाल्याची माहिती कडू यांनी दिली.आमदार बच्चू कडू हे प्रसारमाध्यमांशी बाेलताना आमदार रवि राणा यांनी केलेल्या बदनामीचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढ्यात मांडणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, प्रहार कार्यकर्त्याच्या भावना आरपारच्या आहेत, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. मात्र, आमदार रवि राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे. मला असे वाटते, आता त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला तर ठीक, त्याने जे काही आरोप केले, त्यासंदर्भात त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे समाधान झाले, तर १ नोव्हेंबर रोजी ‘अल्टिमेटम’बाबतचा विचार करू आणि जी बदनामी केली आहे ती परत द्यावी, विषय संपला, असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

आमदार रवि राणा मुंबईला पोहोचलेआमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यात खोके, किराणा वाटपावरून सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. राणा, कडू या दोन्ही आमदारांना भेटीसाठी वेगवेगळी वेळ दिली आहे. त्यानुसार आमदार रवि राणा हे रविवारी सकाळी ९.२५ वाजेच्या सुमारास मुंबईला गेले. आमदार बच्चू कडू यांनी रविवारी रात्री ८ वाजता मुंबईला निघणार असल्याचे सांगितले. 

कडू, राणा यांच्यात मनोमीलनाचे संकेतमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी रवि राणा व बच्चू कडू यांना रविवारी मुंबईला बोलावले. त्यांच्यात उफळलेला वाद शिंदे-फडणवीस दूर करण्याची व रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत मनोमीलन होण्याची दाट शक्यता आहे.

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूRavi Ranaरवी राणा