घरगुती उपायांतून मिळवा स्वाईन फ्लूवर नियंत्रण
By Admin | Updated: February 26, 2015 00:08 IST2015-02-26T00:08:39+5:302015-02-26T00:08:39+5:30
राज्यभरात स्वाईन फ्लूचे थैमान आहे. घाबरून न जात घरगुती उपायांतूनही त्यावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते, ....

घरगुती उपायांतून मिळवा स्वाईन फ्लूवर नियंत्रण
अमरावती : राज्यभरात स्वाईन फ्लूचे थैमान आहे. घाबरून न जात घरगुती उपायांतूनही त्यावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते, अशी माहिती स्वामी रामेश्वरम महाराज यांनी बुधवारी चंद्रकांत जाजोदिया यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
काही महिन्यांपासून देशभरातील अनेक राज्यांमध्ये स्वाईन फ्लू आजाराने अनेकांचे बळी गेलेत. मात्र त्या दृष्टीने पाहिजे तशा उपाययोजना होत नसल्याचे आढळून आले आहे.
घरगुती उपायांतून आपण स्वाईन फ्ल्यू या जिवघेण्या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो, असा विश्वास स्वामी रामेश्वरम महाराज यांनी व्यक्त केला.
काय आहेत उपाय?
सर्दी, खोकला व ताप ही लक्षणे आढळल्यास तुळशीची १० ते १२ पाने, काळ्या मिरचीचे १० दाणे, अद्रकाचा तुकडा, खुबकला (जडीबुटी) २ ग्रॅम, मनुका ७ ते ८ तुकडे असे मिश्रण करुन दोन ग्लास पाणी गरम करणे, पाणी निम्यापेक्षा कमी झाल्यावर त्यात चिमूटभर हळद घालावी. हे मिश्रण दिवसांतून दोन वेळा म्हणजेच सकाळी सयंकाळी घेतल्यास 'स्वाईन फ्लू' या आजारावर नियंत्रण मिळवू शकतो.
श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांनी लाल तुरटी तव्यावर गरम करून फुलवावी. जेवढी फिटकरी गरम केली, तेवढीच हळद टाकून मिश्रण करावे, हे मिश्रण दिवसातून तीनवेळा सहदासोबत चाखावे. त्यासोबतच कोवळ्या उन्हात बसणे व व्यायाम करणे, हे उपाय नियमित केल्यास स्वाईन फ्लूचे जंतू नष्ट होतात. याशिवाय वमन कर्म (गरम पाण्याचा गुराळा करणे) केल्यास पाण्यासोबत जंतू बाहेर पडू शकतात, असा सल्ला त्यांनी दिला.