संस्थाप्रमुखाला अटक करा

By Admin | Updated: August 14, 2016 00:02 IST2016-08-14T00:02:08+5:302016-08-14T00:02:08+5:30

मागासवर्गीयांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

Get arrested by the institution | संस्थाप्रमुखाला अटक करा

संस्थाप्रमुखाला अटक करा

मागणी : मानवी हक्क अभियान
अमरावती : मागासवर्गीयांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात विद्यार्थ्याचे शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न करून त्याचा गळा कापण्यात आला. हा विद्यार्थी मातंग समाजाचा आहे. यापूर्वीही आश्रम परिसरात अशा घटना घडल्या आहेत. परंतु संस्था प्रमुख आणि प्रशासनातील दोषींना कारवाईतून वगळण्यात आले. संबंधितांना त्वरित अटक करून अत्याचारग्रस्तांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी मानवी हक्क अभियानाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ हातागडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
यावेळी दादासाहेब क्षीरसागर, सुनील घटाळे, गणेश गायकवाड, प्रकाश वाळसे, सुरेश स्वर्गे, दिलीप प्रधान, विजय चव्हाण, गणेश कल्हाने, देवानंद वानखडे, बबन इंगोले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Get arrested by the institution