शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिटांना जूनपर्यंत तूर्त ‘ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

कोरोना महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर श्रमिक ट्रेन सुरू करून परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविले. ११ नोव्हेंबरपासून जनरल तिकीट सुरू करण्यात आले. मेमू ट्रेनमध्ये जनरल तिकिटांची सुविधा आहे.  हाॅलिडे आणि स्पेशल ट्रेन वगळता अन्य रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे; परंतु यापूर्वीच्या नियमावलीनुसार १२० दिवसांपर्यंत रेल्वे गाड्यांचे आरक्षण दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे प्रशासनाने हॉलिडे आणि स्पेशल ट्रेन वगळता अन्य गाड्यांमध्ये जनरल तिकीट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १२० दिवसांपर्यंतचे आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता १ जुलै २०२२ पासून रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट नियमावली लागू होईल, अशी माहिती आहे.कोरोना महामारीमुळे २२ मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर श्रमिक ट्रेन सुरू करून परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविले. ११ नोव्हेंबरपासून जनरल तिकीट सुरू करण्यात आले. मेमू ट्रेनमध्ये जनरल तिकिटांची सुविधा आहे.  हाॅलिडे आणि स्पेशल ट्रेन वगळता अन्य रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे; परंतु यापूर्वीच्या नियमावलीनुसार १२० दिवसांपर्यंत रेल्वे गाड्यांचे आरक्षण दिले आहे. यामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही रेल्वे गाड्यात नव्या नियमानुसार जनरल तिकीट देता येणार नाही, हे वास्तव आहे.

जनरल तिकीट

या रेल्वेत मिळणार जनरल तिकीटमध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नागपूर व भुसावळ विभागाअंतर्गत एकमात्र मेमू ट्रेनमध्ये हल्ली जनरल तिकीट मिळण्याची सुविधा आहे. अमरावती ते भुसावळ आणि अमरावती ते वर्धा या दरम्यान मेमू ट्रेन धावत आहे. अन्य गाडीत जनरल तिकीट मिळणार नाही.

या रेल्वे गाड्यात मिळणार नाही जनरल तिकीटअमरावती- मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल एक्स्प्रेस, गीतांजली, अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्सप्रेस आदी गाड्यांमधून प्रवासासाठी जनरल तिकीट मिळणार नाही. 

प्रवासी म्हणतात

अप-डाऊन करताना जनरल तिकीट हे सोयीचे ठरते. मात्र, रेल्वेची नवीन नियमावली काही काळ प्रतीक्षेत असणार आहे. कोरोनानंतर रेल्वेच्या वाढीव भाड्यांमुळे दिलासा मिळेल, असे चित्र होते. -विनाेद गजभिये, प्रवासी.

कोरोनाकाळात आरक्षण तिकीट घेऊनच रेल्वेत प्रवास करावा लागला. तथापि, अगाेदरच्या नियमांनुसार १२० दिवसांपर्यत आरक्षण देण्यात आल्याने जनरल तिकिटांसाठी प्रतीक्षा करावी लागेल.- प्रगती बांबोडे, अमरावती.

सर्वसामान्य प्रवाशांना फटका कायमकोरोना महामारीने २२ मार्च २०२० पासून रेल्वेत जनरल तिकीट बंद करण्यात आले होते. विशेष ट्रेन, हॉलिडे स्पेशल या नावाने सुरू असलेल्या रेल्वेमधून प्रवास करताना अतिरिक्त भाडे द्यावे लागते. आता कसेतरी रेल्वेत जनरल तिकीट मिळणार असताना १२० दिवसांच्या आरक्षणामुळे ३० जूनपर्यंत २०२२ पुन्हा जनरल तिकिटांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना फटका कायम आहे.

रेल्वेच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाते. हॉलीडे, स्पेशल ट्रेन वगळता अन्य गाड्यांमध्ये जनरल तिकीट देण्याची नियमावली लागू झाली असली तरी अगोदर १२० दिवसांचे आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ३० जूननंतरच रेल्वेत जनरल तिकीट देण्याची कार्यवाही केली जाईल.- महेंद्र लोहकरे, प्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक

 

टॅग्स :railwayरेल्वे