२० आॅक्टोबरपूर्वी नगरपरिषदांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ?

By Admin | Updated: October 15, 2016 00:15 IST2016-10-15T00:15:40+5:302016-10-15T00:15:40+5:30

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा कार्यकाळ २७ डिसेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वी सार्वजनिक निवडणूक होणार आहे.

General Election Program of municipal corporation before October 20? | २० आॅक्टोबरपूर्वी नगरपरिषदांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ?

२० आॅक्टोबरपूर्वी नगरपरिषदांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ?

२७ डिसेंबरला मुदत संपणार: आज जाहीर होणार प्रभागनिहाय मतदार यादी 
अमरावती : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा कार्यकाळ २७ डिसेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वी सार्वजनिक निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची लगभग वाढली आहे. १५ आॅक्टोबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होत असल्याने २० आॅक्टोबरच्या आत नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील धामणगाव, चिखलदरा, शेंदूरजना घाट, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, दर्यापूर, चांदूर रेल्वे, चांदूरबाजार व मोर्शी नगरपरिषदांचा कार्यकाल हा येत्या २७ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक कार्यकाळ हा येत्या २७ डिसेंबरला संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी आयोगाची लगबग सुरू आहे.
सद्यस्थितीत या नऊही नगरपरिषदांमध्ये मतदार यादीचा कार्यक्रम २६ सप्टेंबरपासून राबविण्यात आला. २६ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्यात. त्यावर सुनावणी होऊन १५ आॅक्टोबरला प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहेत.
या दिनांकानंतर कुठल्याही क्षणी राज्य निवडणूक आयोगाद्वारा नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होणार आहेत. १७ किंवा २० आॅक्टोबरला हा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी माहिती नगरविकास विभागाच्या सूत्रांनी दिली.
यापूर्वी ५ आॅक्टोबरला मंत्रालयाच्या परिषद सभागृहात नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच उमेदवारीचे बाशिंग बांधून इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

नगराध्यक्षाची थेट जनतेमधून होणार निवड
राज्य निवडणूक आयोगाचे २३ सप्टेंबरच्या पत्रानुसार यावर्षी प्रथमच थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे या पदासाठी मोठ्या संख्येनी उमेदवार रिंगणात राहतील. नगराध्यक्षांचे आरक्षणदेखील जाहीर झाल्याने कुणाला उमेदवारी द्यावी, असा पेच पक्षनेतृत्त्वाला पडला आहे. जिल्ह्यात धामणगाव सर्वसाधारण, धामणगाव सर्वसाधारण स्त्री राखीव, शेंदूरजना घाट अनु. जाती, अचलपूर नामाप्र स्त्री राखीव, अंजनगाव सर्वसाधारण, वरुड सर्वसाधारण स्त्री राखीव, दर्यापूर सर्वसाधारण, चांदूररेल्वे नामाप्र, चांदूरबाजार नामाप्र व मोर्शीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गात महिलासाठी राखीव आहे.

Web Title: General Election Program of municipal corporation before October 20?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.