सुगवे आश्रमात गीता जयंती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST2020-12-31T04:13:20+5:302020-12-31T04:13:20+5:30
चांदूर रेल्वे : स्थानिक देवगाव मार्गावरील सुगवे आश्रमात गीता जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. १९ ते २६ डिसेंबर दरम्यान ...

सुगवे आश्रमात गीता जयंती महोत्सव
चांदूर रेल्वे : स्थानिक देवगाव मार्गावरील सुगवे आश्रमात गीता जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. १९ ते २६ डिसेंबर दरम्यान सदर कार्यक्रम हा फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून पार पडला. नेपाळचे राजगुरू गौरीशंकराचार्य महाराज तसेच हृषीकेश येथील योगी अद्वित्यानंद महाराज उपस्थित होते.
सद्गुरू स्वामी अनिल महाराज यांचे भगवद्गीतेवरील निरूपण तसेच आत्मज्ञानावर प्रवचन झाले. २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता गोपूजन आणि सकाळी १० वाजता होमहवन करण्यात आले. गीता जयंतीला सद्गुरुंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने सकाळी ११ वाजता पाद्यपूजन करण्यात आले. सुगवे संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पंडित यांनी सर्वांना यथाशक्ती आश्रमाला गोसेवेसाठी मदत देण्याचे आवाहन केले. २६ डिसेंबर रोजी गोपाळकाला आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.
आयोजक सुरेश वेदातवार, धीरज डेहनकर, अनिल कांबळे, विशाल वेदातवार, पंकज खोरगडे, ज्योत्स्ना माई, सूर्यप्रकाश राव, राजीव शिवणकर आदी सदस्य उपस्थित होते..