आमदारांच्या उपस्थितीत गाजली नगरपालिकेची सभा

By Admin | Updated: May 15, 2016 00:03 IST2016-05-15T00:03:15+5:302016-05-15T00:03:15+5:30

येत्या दिवाळीपर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकूल देण्यासोबतच शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा ....

Gazli Municipal Council meeting in the presence of MLAs | आमदारांच्या उपस्थितीत गाजली नगरपालिकेची सभा

आमदारांच्या उपस्थितीत गाजली नगरपालिकेची सभा

मूलभूत समस्या ऐरणीवर : अतिक्रमणाचा मुद्दा गाजला
परतवाडा : येत्या दिवाळीपर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकूल देण्यासोबतच शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा अचलपूर नगर पालिकेच्या सभेत चांगलाच गाजला. नागरिकांच्या मूलभूत समस्या निकाली काढण्यात कामचुकारपणा अधिकाऱ्यांना खुद्द आ. बच्चू कडू यांनी चांगलेच धारेवर धरले असून नगर पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असा खणखणीत इशाराही त्यांनी सभेत दिला.
अचलपूर पालिकेची सभा आ. बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पार पडली. सभेत जुळ्या शहरातील अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हेच अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याने शहरातील अतिक्रम हटविण्याची मागणी केली. येत्या दिवाळीपर्यंत रमाई आवास योजनेंतर्गत एस.सी., एस.टी. तसेच बीपीएलच्या लाभार्थ्यांना घरकूलसाठी त्यांचा प्रस्ताव पाठविण्याचे ठरले आहे. सर्वेक्षणाचे आदेश पालिकेला देण्यात आले. घरकूल योजनेत सुुलतानपुरा भागात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत एसडीओंच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करून दोषींवर कायदेशीर कारवाईच्या सूचना सभेत दिल्या. पंतप्रधान आवास योजनेसाठी १६ ते ३१ मे पर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी कालावधी असून जनजागृती व्हावी, यासाठी जाहिरात, फ्लॅक्सव्दारे प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. आतापर्यंत गोळा झालेले अर्ज आॅनलाईन भरण्याची कारवाई न केल्याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. येत्या काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने सापन व बिच्छन नदीच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याच्या सूचना करण्यात आल्या. याबाबत विकास आराखडा तयार करण्याचे आदेशही सभेत देण्यात आलेत. (प्रतिनिधी)

Web Title: Gazli Municipal Council meeting in the presence of MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.