शहानूर प्रकल्पाचे दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडले, धरणात पाण्याची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST2021-07-25T04:12:46+5:302021-07-25T04:12:46+5:30
शहानूर प्रकल्पाचे दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडले धरणात पाण्याची आवक वाढली अनिल कडू परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शहानूर प्रकल्पाचे ...

शहानूर प्रकल्पाचे दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडले, धरणात पाण्याची आवक वाढली
शहानूर प्रकल्पाचे दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडले
धरणात पाण्याची आवक वाढली
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील शहानूर प्रकल्पाचे दोन दरवाजे ४० सेंटीमीटरने तर दोन दरवाजे ३० सेंटीमीटरने, शनिवार २४ जुलैला उघडल्या गेले आहेत. धरण ६१.१३ टक्के भरले आहे.
धरणाच्या उघडल्या गेलेल्या चारही दरवाजांची उंची वाढविल्या गेल्यामुळे शहानूर नदीत ४५.३९ घनमीटर प्रति सेकंदने धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
सर्वप्रथम गुरुवार २२ जुलैला या शहानूर धरणाचे चारही दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. शुक्रवार २३ जुलैला हे चारही दरवाजे २५ सेंटीमीटरने उघडल्या गेले. शनिवारला मात्र हे दरवाजे ४० सेंटीमीटर व ३० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरणात १०७.५५ घनमीटर प्रति सेकंदने पाण्याची आवक सुरू आहे.
दि.24/7/21 फोटो