शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

गॅस टँकर गळती; नागपूर-औरंगाबाद महामार्ग ४० तासांनंतर झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 13:33 IST

मुंबईवरून नागपूरच्या खापरी या औद्योगिक क्षेत्राकडे गॅस घेऊन जाणारा टँकर बुधवारी उलटल्यानंतर तब्बल ४० तासांनंतर शुक्रवारी सकाळी नागपूर-औरंगाबाद हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षितरित्या मोकळा झाला.

ठळक मुद्देप्रशासन विचारणार जाबमोठी दुर्घटना टळली

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: मुंबईवरून नागपूरच्या खापरी या औद्योगिक क्षेत्राकडे गॅस घेऊन जाणारा टँकर बुधवारी उलटल्यानंतर तब्बल ४० तासांनंतर शुक्रवारी सकाळी नागपूर-औरंगाबाद हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षितरित्या मोकळा झाला. या दुर्घटनेच्या स्थळापासून दोन्ही बाजूला किमान २० कि.मी. अंतरावर जड वाहतूक ठप्प झाली होती. या प्रकरणी वाहतुकीला झालेला खोळंबा व गॅस गळती बंद करण्यात संबंधित कंपनीकडून झालेल्या विलंबाबद्दल प्रशासनाकडून जाब विचारला जाणार आहे.काय आहे घटना?बुधवारी सकाळी साडे सहा वाजता नागपूरकडे हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस टँकर क्र .एन एल ए ए 0४२६ देवगाव पासून एक किलोमीटर अंतर भारत पेट्रोल पंपाजवळ उलटला होता. घटना घडताच या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. नागपुरकडून येणारी वाहतूक धामणगाव रेल्वेमार्गे वळविण्यात आली तर मुंबईवरुन येणारी जड वाहने चांदुररेल्वेमार्गे वळविण्यात आली. मात्र जड वाहतूक ठप्प झाल्याने तब्बल २० किलोमीटरपर्यंत वाहनांची रीघ लागली होतीदोन टन गॅस परिसरात पसरलाया घटनास्थळावर होत असलेल्या गळतीतून निघणाऱ्या गॅसने सुमारे दोन किलोमीटरचा परिसर वेढला होता. यामुळे येथील नागरिक भयभीत झाले होते. या भागातील विद्युत पुरवठाही तात्काळ बंद करण्यात आला होता. अपघातग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस भरण्यासाठी सात तास लागले.हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मदत यंत्रणेला विलंबमुंबई-पुणे महामार्गावर हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीने मदत यंत्रणा जशी उभी केली आहे तशी ती नागपूर- औरंगाबाद महामार्गावरही असावी अशी गरज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या महामार्गावरून गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरची संख्या दररोज सुमारे ४० च्या जवळपास आहे.दोन किलोमीटरचा परिसर झाला निर्मनुष्यगॅसची गळती सुरू झाल्यानंतर तो ज्वलनशील असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. विद्युत पुरवठा बंद करण्याची खबरदारी प्रशासनाने घेतलीच होती. या गॅसचा दुर्गंध सुमारे ५ कि.मी. च्या परिसरात जाणवत होता.

टॅग्स :Accidentअपघात